आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसांत लखनऊवासियांनी मोडले मेट्रोचे हे 5 नियम, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेट्रोमध्‍ये विनातिकीट किंवा अधिक प्रवास केल्‍यास 50 रुपयांचा दंड आणि एका महिन्‍याचा तुरुंगवास होऊ शकतो. - Divya Marathi
मेट्रोमध्‍ये विनातिकीट किंवा अधिक प्रवास केल्‍यास 50 रुपयांचा दंड आणि एका महिन्‍याचा तुरुंगवास होऊ शकतो.
लखनऊ- उत्‍तरप्रदेशच्‍या राजधानीत मेट्रोसेवेला सुरुवात झाली आहे. पहिल्‍याच दिवशी म्हणजे 6 सप्‍टेंबर रोजी बुधवारी या मेट्रो रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. यादिवशी मेट्रो २ तास बंद होती. याचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला होता. मात्र लखनऊच्‍या प्रवाशांनीही केवळ 3 दिवसांत मेट्रोच्‍या नियमांची एैशीतैशी केली आहे. तपासणी केली असता प्रवाशांकडे गुटख्‍यांचे पाकिटे निघाले. कुणी मेट्रोमध्‍ये सेल्फि घेत होते तर कुणी मेट्रोतील सीटवर अक्षरश: झोपले होते. वास्‍तवात हे सर्व करण्‍यास मनाई आहे. 
 
लखनऊकरांनी 3 दिवसांत मोडले हे 5 नियम 
- एलएमआरसीचे जनसंपक अधिकारी अमित श्रीवास्‍तव यांनी माहिती दिली आहे की, आपत्‍तीजनक वस्‍तू मेट्रोत घेऊन गेल्‍यास 500 रुपयांचा दंड आहे.  असे असतानाही 48 तासांमध्‍ये केलेल्‍या कारवाईत प्रवाशांकडून जवळजवळ 20 किलो पान मसाले आणि तंबाखू जप्‍त करण्‍यात आले आहेत. सध्यातरी त्‍यांना फक्‍त वॉर्निंग देऊन सोडण्‍यात आले आहे.  
- विनातिकीट प्रवास केला किंवा काढलेल्‍या तिकीटापेक्षा अधिक प्रवास केला तर 50 रुपयांचा दंड किंवा एका महिन्‍याच्‍या तुरुंगाची शिक्षा होऊ शकते. 
- मेट्रोमध्‍ये फोटोज काढणे किंवा कोणत्‍याही पध्‍दतीच्‍या कॅमे-याचा  वापर करण्‍यास मनाई आहे. तरीदेखील लखनऊ ट्रेनमध्‍ये प्रवाशांनी सर्रासपणे कॅमे-यांचा वापर केला. 
- मेट्रोमध्‍ये जमिनीवर बसण्‍यासही मनाई आहे. तरीदेखील दुस-याच दिवशी लोकांनी हा नियम मोडला. 
- ज्‍येष्‍ठ नागरीक, दिव्‍यांग आणि महिलांसाठी सिट्स आरक्षित असतात. तरीदेखील मोठ्या प्रमाणात प्रवासी या सिट्सवर बसलेले आढलेले. 
 
मुलांना घडवली जातेय सहल 
- विशेष म्‍हणजे नॅशनल पीजी कॉजेजसहीत 3 शाळांच्‍या विद्यार्थ्‍यांनी सहलीसाठी मेट्रोट्रेनमध्‍ये बसविले गेले.
- एलएमआरसीचे एमडी कुमार केशव यांनी स्‍वत: मेट्रोची तपासणी केली आहे.  

पुढील स्‍लाइडवर वाचा, मेट्रोमध्‍ये  या गोष्‍टींची घ्‍या काळजी... 
 
 
बातम्या आणखी आहेत...