आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगींनी केले लखनऊ मेट्रोचे उद्घाटन, अखिलेश म्हणाले- इंजिन आधीच धावले होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगी आदित्यनाथ यांनी मेट्रोचे उद्घाटन केले, बुधवारपासून मेट्रो सर्वसामान्यांना घेऊन धावणार. - Divya Marathi
योगी आदित्यनाथ यांनी मेट्रोचे उद्घाटन केले, बुधवारपासून मेट्रो सर्वसामान्यांना घेऊन धावणार.
लखनऊ - येथे मेट्रो टेन सर्व्हिस मंगळवारपासून सुरु झाली आहे. बुधवारपासून मेट्रो सर्वसमान्यांसाठी सुरु होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटन दाबून मेट्रो ट्रेन रवाना केली. यावेळी राज्यपाल राम नाईक, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. दुसरीकडे, अखिलेश यादव यांनी आज (मंगळवार) सकाळी सोशल मीडियावर जुने फोटो ट्विट करत लिहिले, 'इंजिन तर पहिलेच धावले होते, मागून डब्बे तर येणारच होते.'
 
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तर प्रदेशात मेट्रो कॉर्पोरेशनची स्थापना केली जाईल. हे कॉर्पोरेशन राज्यात कुठे-कुठे मेट्रो सुरु करता येऊ शकते याचा आढाव घेईल.
- राजनाथ सिंह म्हणाले, 'आजचा दिवस उत्तर प्रदेशसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. नवाबांचे हे शहर आता मेट्रोचे शहर म्हणूनही ओळखले जाईल.'
- ते म्हणाले, 'मेट्रोचा सर्वात मोठा फायदा हा आहे की हि जिथून धावते तिथे विकास देखील वेगाने धावतो. मेट्रोच्या रुपाने जागतिक दर्जाचे ट्रान्सपोर्टेशन आता लखनऊमध्ये सुरु झाले आहे.'
 
श्रीधरन म्हणाले- मेट्रोचा वापर नियमपाळून करा 
- मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध ई. श्रीधरन यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, 'विक्रमी वेळेत मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे. लखनऊच्या जनतेला विनंती आहे की त्यांनी मेट्रोची काळजी घ्यावी आणि नियमांत राहून या सेवेचा उपभोग घ्यावा.'
 
अखिलेश म्हणाले - इंजिन आधीच धावले होते.. 
- मेट्रोच्या उद्घाटनाआधी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काही जुने फोटो ट्विट केले. ते म्हणाले, 'इंजिन तर आधीच धावले होते, डब्बे मागून येणारच होते.' अखिलेश यादव यांनी 1 डिसेंबर 2016 ला मेट्रोला हिरवी झेंडी दाखवली होती. मुलायमसिंह यादव यांनी फित कापून मेट्रोचे उद्घाटन केले होते. 
- लखनऊमध्ये मेट्रोची सुरुवात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात झाली होती. 
- अखिलेश यादव यांनी ट्विट केलेल्या फोटोंसोबत लिहिले आहे, 'समाजवाद्यांनी सुरु केलेल्या बेस्ट मेट्रोमध्ये बसण्यापूर्वी, लखनऊच्या रस्त्यांवर असलेल्या 5 हजार बेवारस जनावरांच्या पालन पोषणाचा प्रश्न सरकारने सोडवावा.' 
- अखिलेश यांच्या कॉमेंटला ट्रोलही केले जात आहे. काहींनी म्हटले आहे की तुम्ही जर एवढे चांगले काम केले तर सत्ते बाहेर का आहात. 
- एकाने अखिलेश यांचे समर्थन करताना लिहिले, 'यांनी (योगी सरकार) काहीही काम केलेले नाही. समाजवादीच्या कामावर चालत आहे योगी सरकार.'
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण चालवणार मेट्रो... 
बातम्या आणखी आहेत...