आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊ मेट्रोचे नमनाला घडाभर तेल, प्रवासी तब्बल 2 तास अडकून राहिल्यानंतर असे निघाले बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मंगळवारी उद्घाटन झालेली लखनऊ मेट्रो बुधवारी सकाळीच बंद पडली.  सकाळी 2 तास ट्रेन बंद पडल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मेट्रोमध्ये 101 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना 400 मीटर पायी चालत स्टेशनवर परत यावे लागले. अचानक बंद पडलेल्या मेट्रोमुळे अनेकांची कामे खोळंबली. एका प्रवाशाचे दिल्लीला जाणारे फ्लाइट मिस झाले.  
 
दिल्लीचे फ्लाइट पकडता आले नाही... 
- मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्शन मोटर खराब झाल्यामुळे इमर्जन्सी कॉल अटेंड करता येत नव्हते. बराचवेळ दुरुस्तीचा प्रयत्न करण्यात आला, मात्र जेव्हा सर्व प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा लोकांना इमर्जन्सी गेटमधून बाहेर काढण्यात आले. या सर्व खटाटोपात प्रवाशांचे 2 तास वाया गेले. 
- मेट्रोमधील गौरव त्रिपाठी या प्रवाशाला लखनऊच्या अमौसी एअरपोर्टवरुन दिल्लीसाठी फ्लाइट पकडायचे होते. गौरव सकाळी 6.10 वाजता ट्रेनने रवाना झाला. 6.38 वाजता तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन दोन तास बंद पडली. 7.30 पर्यंत दुरुस्ती न झाल्याने प्रवाशांना इमर्जन्सी गेटने बाहेर काढण्यात आले. मात्र या सर्व भानगडीत गौरवचे फ्लाइट मिस झाले. 
- यावर लखनऊ मेट्रोकडून (LMRC) त्याला फक्त सॉरी शिवाय काहीही मिळाले नाही. गौरव म्हणाला, 'मला याबाबत कायदेशीर माहिती मिळाल्यास मी तिकीटाच्या रकमेसाठी क्लेम करेल.'
 
अधिकारी काय म्हणाले... 
- लखनऊ मेट्रोचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अमित श्रीवास्तव म्हणाले, की मवैया आणि दुर्गापुरी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रेन बंद पडली होती. त्यानंतर प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. कोणतीही धावपळ या दरम्यान झाली नाही. 40 मिनिटांमध्ये प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रवाशांना कसे काढले बाहेर... 
बातम्या आणखी आहेत...