आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले आधुनिक हायकोर्ट; न्यायाधीशांसाठी फिजिओथेरपी सुविधा, जिम, बँक, पोलिस ठाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - लखनऊमध्ये देशातील पहिले आधुनिक उच्च न्यायालय सुरू झाले आहे. सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत शनिवारी या इमारतीचे उद््घाटन झाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठाची ही इमारत उभारण्यासाठी ३ वर्षे लागली. खर्च आला १२०० कोटी रुपये.

न्यायालयाच्या इमारतीतच फिजिओथेरपी केंद्र असून न्यायमूर्तींना तणावमुक्तीसाठी याचा उपयोग होईल. या तीनमजली इमारतीच्या तळमजल्यावर रजिस्ट्रारसह इतर विभाग आहेत. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर न्यायालये असून परिसरातच बँक, रिझर्व्हेवेशन काउंटर, औषधालय, टपाल कार्यालय, पोलिस स्टेशन, अग्निशामक विभाग यांसारख्या सुविधा आहेत. न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा असलेले जिम येथे आहे. सोबत एक लाख पुस्तके असलेले ग्रंथालयही. हा पूर्ण परिसर वायफाय असेल. इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही दिशेने ही इमारत समोरून पाहिल्यासारखी दिसते. इमारतीच्या मागच्या बाजूस आहोत, असे कुणाला जाणवतच नाही. ताजमहाल पाहताना हा अनुभव येतो. राजस्थान व चुनारहून मागवलेल्या बलुआ खडकाचा इमारत बांधकामात वापर करण्यात आला आहे. अातील लाकडी सजावट पाहताना एखाद्या चित्रपटातील कोर्ट पाहत असल्याचा अनुभव येतो. न्यायाधीश व वकिलांसाठी वेगवेगळे रस्ते असून न्यायाधीशांसाठीचे मार्ग व लोकांसाठीचे रस्ते वेगवेगळे आहेत.
> २०१२ मध्ये इमारत बांधकाम सुरू
> ५०० कोटी रुपये खर्च वाढला
> ४० एकरात ३ मजले उभारले
> १४०० खोल्या तयार असून एवढ्याच खोल्यांचे बांधकाम होणे बाकी
> ५७ न्यायालये इमारतीत असून यात
> ५५ लहान व २ मोठ्या कोर्टरूम.
बातम्या आणखी आहेत...