आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP मध्ये प्राप्तीकर उपायुक्ताने 14 व्या मजल्यावरून पत्नीला फेकले, आरोपी फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ- हजरतगंजजवळ एका अपार्टमेंटच्या 14 व्या मजल्यावरून प्राप्तीकर विभागाच्या उपायुक्ताने पत्नीला फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नम्रता पासवान (28) असे मृत महिलेचे नाव आहे. तर प्राप्तीकर विभागात उपायुक्त पदावर कार्यरत दीपरतन चौधरी असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर दीपरतन फरार आहे. त्याचा फोनही स्वीच ऑफ आहे. 
दीपरतन हुंड्यासाठी नम्रताला वारंवार टॉर्चर करत असल्याचे तिच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे.
 
नम्रताचे पतीसोबत झाले होते कडाक्याचे भांडण... 
- पोलिसांनी सांगितले की, 10 जून, 2015 रोजी गोरखपूरची राहाणारी नम्रता हिचा दीपरतन चौधरीसोबत विवाह झाला होता.
- नम्रता गुरुवारी वडील आर.एन पासवान यांच्या घरी सरोजनीनगरात बहिणीच्या साखरपुड्याला गेली होती. 
- ती 4.30 वाजता घरी परतली तेव्हा फ्लॅटला लॉक होता. नम्रता हिने तत्काळ पतीला फोन केला. 
- त्यानंतर दीपरतन तब्बल दोन तासांनी घरी आला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती मिळाली आहे.

हत्येचा संशय... 
- रात्री 8.30 वाजता अपार्टमेंटवरून काही तरी पडल्याचा आवाज ऐकल्याचे सुरक्षा रक्षक कृष्णा यादव याने सांगितले.
- तो स्पॉट गेला असता, त्याला नम्रता पासवान रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. 
- एएसपी शिवराम यादव यांनी सांगितले की, नम्रताचा मृतदेह पाहिला असता तिला 14 व्या  मंजल्यावरून खाली फेकण्यात आले आहे. घटनेनंतर तिचा पती दीपरतन देखील बेपत्ता आहे. त्याचा फोन स्विच ऑफ आहे. 
- घटनास्थळी नम्रताचे आई-वडील आले होते. तिच्या सासरचा एकही नातेवाईक पोहोचला नाही. 
- दीपरतन, पत्नी आणि आईसोबत अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 104 मध्ये राहात होते.
- घटनेनंतर दीपरतन आणि त्याची आई बेपत्ता आहे.

हुंड्यासाठी नम्रताला मारझोड करत होता पती...
- नम्रता हिच्या माहेरच्या लोकांना सांगितले की, दीपरतन मागील काही दिवसांपासून नम्रताचा छळ करत होता. तिला हुंड्यासाठी मारझोडही करत होता. 
- अनेकदा नम्रताने जखमांचे फोटो तिच्या आई-वडीलांना वॉट्सअॅप केले होते.
- पोलिसांना14 व्या मजल्यावर दोघांमध्ये झालेल्या झटापटीचे निशाणही आढळून आले आहेत. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, या घटनेशी संबंधित फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...