आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्याला येणार्‍या झेलम एक्स्प्रेसला अपघात; 10 डबे घसरले, सतलज नदीजवळ झाला अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- जम्मूहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या झेलम एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरले. जालंधर-लुधियानादरम्यान फल्लौर येथे सतलज नदीजवळ मंगळवारी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृृती गंभीर आहे. दुर्घटनेमुळेे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. 

मिळालेली माहिती अशी की, जालंधरहून लुधियानाकडे निघालेल्या जम्मुतवी-पुणे (ट्रेन नंबर 11077) झेलम एक्स्प्रेसचे 10 डबे फिल्लौर येथे रुळावरुन घसरले. कोच एस-1 ते  एस-10 पर्यंतच्या डब्यांचे नुकसान झाले आहे. पेंट्री कारचे देखील नुकसान झाले आहे. सुरुवातीला एक डबा रुळावरून घसरला. त्यानंतर सलग नऊ डबे घसरले. या दुर्घटनेमुळे अप-डाऊन साइडचे रेल्वे रुळ 2 किलोमीटर अंतरापर्यंत उखडले आहेत. यामुळे दोन्ही बाजुची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दिल्लीकडे येणार्‍या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहे.

दुर्घटनेेमुळेे  जालंधर-दिल्ली, अमृतसर-दिल्ली इंटरसिटी, अमृतसर-हरीव्दार, जनशताब्दी आणि अमृतसर-चंदीगड सुपरफास्ट एक्स्प्रेेस या गाडया रद्द करण्यात आल्या आहे. याशिवाय अनेक गाड्याचा मार्ग बदलण्यात आला आहे.

अरविंदर कुमार, जयप्रकाश आणि सतीश कुमार अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर फिल्लौर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. उर्वरित दोन जखमींना लुधियाना येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

बचाव कार्य सुरु झाले आहे. सतलुज नदीपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याचे फिल्लौर एसडीएम आणि डीएसपी यांनी सांगितले आहे. 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, रेल्वे विभागाने जारी केलेले हेल्पलाइन क्रमांंक... दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...