आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयावह अपघातापूर्वीचा व्हिडिओ, कारमध्ये धमाल मस्ती करत होते यंगस्टर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब) - लुधियानामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भायनक अपघातात चार कॉलेज तरुण-तरुणींचा दुर्दैवी अंत झाला, त्यांच्यासोबतचा एक जीवन-मरणाची लढाई लढत आहे. अपघात एवढा भयानक होता, की कार रस्त्यावर 8 फूट उसळून एका झाडावर जाऊन आदळली होती. यात कोणाचा पाय फाटला, कोणाचे डोके फुटून मेंदू बाहेर पडला. अपघाताआधीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात पाचही तरुण-तरुणी मस्ती करताना दिसत आहेत. याआधीही त्यांनी एका दारु दुकानासमोर उभे राहून त्यांनी डान्स केला होता. 
 
गाणे गात नाचत होते यंगस्टर्स 
- अपघाताच्या काही क्षणांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये कारमधील तीन मुले आणि दोन मुली एका ठिकाणी उतरून फोटो सेशन करत होते. त्यानंतर कारमध्ये त्यांनी गाणी गात मस्ती केली. त्याचा व्हिडिओ तयार केला होता. 
- व्हिडिओमध्ये पाचही जण लिखे जो खत तुझे हे गाणे म्हणतात दिसतात. त्यासोबतच त्यांनी कारचा वेगही वाढवलेला असतो. 
- ज्या मार्गावर अपघात झाला त्याच रस्त्यावर तरुणांनी फोटो आणि व्हिडिओ शुट केलेला आहे. व्हिडिओ स्नॅप चॅटवर अपलोड केल्यानंतर काही क्षणातच अपघात घडतो. 
वृद्धाने दिला होता कार हळू चावण्याचा सल्ला 
- दुर्घटनेआधी पाचही तरुण-तरुणी नदी किनारी बसून दारू पित होते. 
- त्यांनी दारु दुकानातून चार बियर बॉटल खरेदी केल्या आणि तिथेच नाचत-गात होते. 
- 15-20 मिनिट नाच-गाणे केल्यानंतर त्यांनी शेजारीच असलेल्या चहा टपरीवर बसण्याची वृद्धाला परवानगी मागितली. 
- वृद्धाने सांगितले, त्या पाचही जणांना धड उभे राहाता येत नव्हते. काही वेळ बसल्यानंतर ते कारच्या दिशेने निघाले, तेव्हा वृद्धाने त्यांना सांभाळून जाण्याचा सल्ला दिला होता. 
- वृद्धाने सांगितले, ते गेल्यानंतर काही वेळातच कळाले की एका कारचा अपघात झाला आहे, तेव्हा पहिली शंका या तरुणांचीच आली होती. 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, तरुणांच्या मस्तीचे आणि अपघाताचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)