आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Luxury Bus Purchased By Chief Minister Of Telangana For Himself

5 कोटींच्या AC बुलेटप्रूफ बसमधील सफरीचा आनंद घेतील तेलंगणाचे CM

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलेट-प्रूफ मर्सिडीज बेंज लक्झरी बस - Divya Marathi
बुलेट-प्रूफ मर्सिडीज बेंज लक्झरी बस
हैदराबाद- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आता बुलेट-प्रूफ मर्सिडीज बेंज लक्झरी बसमधून सफरीचा आनंद घेणार आहेत. या आलिशान बसची किंमत पाच कोटी रुपये असून ही बस 12 सीटर आहे. विशेष म्हणजे ही बस दुमजली आहे. मुख्यमंत्री राज्याचा दौर्‍यावर जाताना या बसचा वापर करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

चंडीगड येथून खरेदी केलेली ही बस शुक्रवारी हैदराबादला पोहोचली. या बसच्या देखरेखीची जबाबदारी राज्याच्या ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडे देण्यात आली आहे.

शनिवारपासून मुख्यमंत्र्याच्या सेवेत...
मुख्यमंत्री राव शनिवार (4 जुलै) वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन करणार आहे. या कार्यक्रमात लक्झरी बसचेही उद्‍घाटन करण्‍यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सीएमओने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सामान्य जनतेप्रमाणे सरकारी बसमधून प्रवास करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. त्यामुळे चंदीगडमधून आलेली बस बुलेट प्रुफ आहे. परंतु लक्झरी बस नाही. बसमध्ये 12 सीट्‍स असून कोणताही बेड नाही. राज्याच्या दौर्‍यावर जाताना बसमध्ये आपल्यासोबत स्टाफही असावा, असे मुख्यमंत्रीची इच्छा होती. दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी बसमधूनच शिडी आहे.

बसचे स्पेसिफिकेशन्स...
- बुलेट आणि लॅंड माइन प्रूफ
- एअरकंडीशन्ड
- वॉशरूम
- 12 सीट्‍स
- दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी शिडी....

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पाच कोटींच्या एसी बुलेटप्रूफ बसचे फोटो...