रोहतक (हरियाणा)- एमकॉमला असलेल्या नवीन नावाच्या 21 वर्षीय विद्यार्थीनीने आई, वडील आणि भावाची माफी मागत सुसाईड नोटमध्ये कार्टून काढून गळफास घेऊन आत्महत्या केली. मी चांगली मुलगी होऊ शकत नाही. याचे दुःख आहे. मी तुम्हाला कायम त्रास देते, असे स्वतःवर आरोप करत ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणीने जीवन संपवले.
का केली आत्महत्या
- नवीनने दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये स्वतःला दोषी धरत आत्महत्या केली. विशेष म्हणजे सुसाईड नोटमध्ये तिने कार्टून काढले आहे.
- तिला कशाचे वाईट वाटत होते याचा उल्लेख नवीनने सुसाईड नोटमध्ये लिहिले नाही. केवळ वारंवार माफी मागितली आहे. कौटुंबीक कलहातून तिने स्वतःला संपवल्याचे सांगितले जात आहे.
- जींद शादिपूर येथील रहिवासी नवीन दररोज सायंकाळी आईवडीलांशी फोनवरुन बोलायची. पण काल सायंकाळी तिने फोन केला नाही. त्यामुळे आईवडील चिंताग्रस्त झाले.
- त्यांनी मुलाला याची माहिती दिली. त्याने तिच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर घेतला. तिला नवीनची भेट घेण्यास सांगितले.
- नवीनची खोली बाहेरुन बंद होती. तिच्या मैत्रिणीने खिडकीतून आत वाकून बघितले तर धक्काच बसला. नवीनने फाशी घेतली होती.
- त्यानंतर तिने इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने एक्झॉस्ट फॅनची खिडकी तोडून आत प्रवेश केला. नवीनला खाली उतरवले. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. पण तिचा मृत्यू झाला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा.... नवीनची सुसाईड नोट.... वाचा काय लिहिले होते तिने....