आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • M K Alagiri Asks His Supporters To Defeat DMK Candidates

‘द्रमुक’ला हरवण्याचा अळगिरींनी बांधला चंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) सरचिटणीस व एम. करुणानिधी यांचे चिरंजीव एम. के. अळगिरी यांच्या हकालपट्टीनंतर पक्षातील गोंधळ अद्याप संपलेला नाही. येत्या 24 एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘द्रमुक’चा मोठा पराभव करण्याचा निर्धार अळगिरी यांनी केला आहे. तामिळनाडूच्या विविध भागांतील सर्मथकांशी जाहीरपणे बोलताना अळगिरी ‘द्रमुक’वर टीका करत आहेत. विशेषत: वडील एम. करुणानिधी यांच्यावरही ते आरोप करत आहेत.

तामिळनाडूत सर्व पक्षांच्या वतीने निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना अळगिरी यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ‘द्रमुक’चे बहुतांश उमेदवार हे आपले धाकटे बंधू एम. के. स्टॅलिन यांच्या जवळचेच लोक आहेत, असा आरोप अळगिरी यांनी केला आहे.