आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रैनाचा विवाह आटोपून धोनी पोहोचला रांचीत, सोबत होती जीवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - क्रिकेटर सुरेश रैनाच्या विवाहाला उपस्थित राहून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी शनिवारी रांचीला परत आला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा होती. धोनीने जीवाला बेबी पाऊचमध्ये घेतले होते.
रांची विमानतळावर धोनीने मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला झाकून घेतले होते. ती बेबी पाऊचमध्ये असल्यामुळे तिचा चेहरा तसाही दिसत नव्हता. पण धोनीने उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून की मीडिच्या कॅमेरापासून दुर ठेवण्यासाठी तिच्या डोक्यावर हात ठेवला होता, हे कळू शकले नाही, धोनी रांचीला येत असल्याचे कळाल्यानंतर विमानतळाबाहेर त्याचे चाहते आणि माध्यमांचे प्रतिनिधी जमा झाले होते.
विमानतळातून बाहेर पडल्यानंतर कारमध्ये बसून धोनी हरमू येथील निवासस्थानाकडे रवाना झाला. तो दिल्लीला टीम इंडियातील फलंदाज रैनाच्या विवाहासाठी गेला होता. (येथे क्लिक करुन पाहा, रैनाच्या विवाहाचे फोटो)