आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB SPL: धोनी म्हणाला- तिन्ही फॉर्मेटमध्ये एकच कर्णधार हवा, म्हणून कर्णधारपद सोडतोय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- ९ वर्षे टीम इंडियाचा कर्णधार राहिलेल्या महेंद्रसिंग धोनीने वनडे व टी-२० चे कर्णधारपद सोडले आहे. मात्र खेळाडू म्हणून ते संघात कायम राहतील. बीसीसीआयने बुधवारी ही घोषणा केली.धोनी सध्या नागपूरमध्ये झारखंडच्या रणजी संघासोबत आहे. 

बुधवारी गुजरातविरुद्ध रणजी सामना हारल्यानंतर धोनीने आपल्या रूममध्ये गेट टुगेदर पार्टील केली. रात्री साडेआठ वाजता सर्व खेळाडू त्याच्या रूममध्ये पोहोचले. त्याच दरम्यान संघाचा कर्णधार सौरभ तिवारीने विचारले,‘ भैय्या, कर्णधारपद का सोडले?’ त्यावर धोनी म्हणाला, ‘ तिन्ही फॉर्मेटमध्ये एकच कर्णधार हवा, असे मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातच म्हणालो होतो. पुढच्या वनडे व टी-२० मध्ये एकच कर्णधार असावा म्हणून मी आता बाजूला झालो. त्यामुळे बीसीसीआयला शक्य तितक्या लवकर नवा कर्णधार निवडता येईल. मी बाजूला झालो नसतो तर प्रकरण रेंगाळले असते.’ त्यानंतर एका खेळाडूने विचारले की,‘ एवढ्या लवकर बाजूला होणे योग्य होते।’ त्यावर धोनी म्हणाला, ‘जीवनात अनेक वळणे येत असतात. मात्र थंड डोक्याने निर्णय घेतला. जे केले ते शंभर टक्के योग्य आहे. आता तुम्ही लोक पुढे जा.’ झारखंड संघाचे व्यवस्थापक पी.एन. सिंह म्हणाले की, धोनी बराच वेळ आमच्या सोबत राहिला. तेव्हा कधी ना कधी कर्णधारपर सोडावे लागेल. तिन्ही फॉर्मेटमध्ये एकच कर्णधार राहिला तर तो संघाला घेऊन चालेल.
 
झारखंडचे प्रशिक्षक व धोनी सोबत रणजी खेळलेले राजीव कुमार राजा यांनी सांगितले की, धोनी कर्णधारपद सोडणार हे सायंकाळपर्यंत आमच्यापैकी कोणालाच माहीत नव्हते. टीव्हीवर बातमी आली आणि मी जाऊन विचारल्यावर धोनी म्हणाला की, हो राज, मी कर्णधारपद सोडले आहे. परंतु क्रिकेट खेळत राहीन.’ निर्णयानंतरही त्याच्या चेहऱ्यावर थोडेसेही काही दिसत नव्हते. पार्टीत खूप मस्ती केली. खेळाडूंसोबत गाणे गायले आणि सेल्फीही काढत राहिला.’
 
वाचा पुढे स्लाईडद्वारे,  टीम इंडियात दोन सत्ताकेंद्रे असू शकत नाहीत, यामुळेच धोनीने घेतली माघार... 
बातम्या आणखी आहेत...