आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Machil Case: Army Orders Disciplinary Proceedings Against Two Officers, Four Others

माचिल एन्काऊंटर; लष्कराच्या 2 अधिकाऱ्यांसह 6 जवानांविरुद्ध कोर्ट मार्शल प्रक्रियेचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- माचिल बनावट एन्काऊंटरप्रकरणी लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह सहा जवानांविरुद्ध कोर्ट मार्शल प्रक्रिया सुरु करण्याचे संरक्षण मंत्रालयाने आज (बुधावर) आदेश दिले. 2010 मध्ये झालेल्या या एन्काऊंटरनंतर काश्मिर खोऱ्यात तब्बल दोन महिने उग्र आंदोलन करण्यात आले होते. त्यात तब्बल 123 नागरिक मृत्युमुखी पडले.
माचिल एन्काऊंटरप्रकरणी लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह सहा जवानांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्याविरुद्ध कोर्ट मार्शल प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश देण्यात आल्याचे लष्कराने सांगितले आहे.
या प्रकरणी राजपूत रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. के. पठानिया आणि मेजर उपेंदर यांच्यासह चौघांविरुद्ध कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
30 एप्रिल 2010 रोजी प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ माचिल सेक्टरमध्ये तीन घुसखोरांना ठार मारल्याचा दावा लष्कराने केला होता. ठार झालेले घुसखोर पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे त्यानंतर सांगण्यात आले होते.
एन्काऊंटरसंदर्भात काय आहेत आरोप, जाणून घ्या पुढील स्लाईडवर