आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील वाघांची अघोषित राजदूत, ११ कोटी छायाचित्रे काढली गेली, टपाल तिकीटही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - मछली... जंगलाचे सौंदर्यशास्त्र समजणाऱ्यांना या नावाचा अर्थ चांगलाच माहीत आहे. रणथंभोरहून मछलीच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर जंगल उदास झाले. व्याघ्रप्रेमी दु:खी झाले. सोशल मिडियावरही ती चर्चेत राहिली. तिचे आश्चर्यचकित करणारे किस्से अनेकांना आठवले. मछलीची डरकाळी ज्यांनी ऐकली होती त्यांनी दु:ख व्यक्त केले. रणथंभोरच्या नॅशनल पार्कची ‘मदर क्वीन’ अशी उपाधी मिळालेली मछली जगातील वाघांची घोषित ब्रँड अम्बॅसिडर होतीच, शिवाय पार्कमधील एकूण वाघांपैकी ७० टक्के तिचीच अपत्यं आहेत.

राजस्थानचे जे वन पर्यटन आहे, त्याची सुरुवात १९ वर्षांपूर्वी मछलीनेच केली होती. सुमारे ११ कोटी छायाचित्रे, १५ आंतरराष्ट्रीय फिल्म्स, टपाल तिकीट आणि क्रोकोडाइल किलर अशा अगणित उपलब्धीबरोबरच मछलीचे सौंदर्यही अवर्णनीय होते. वाघांनी फक्त पर्यटन संकेतस्थळे, सरकारी जाहिरातींत पर्यटकांना निमंत्रित करावे, त्यांनी चित्रपट निर्माते, छायाचित्रकारांची रोमांचाची इच्छा पूर्ण करावी,असे होत नाही. वाघ हे वनसृष्टीचे महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत. ते जंगल आणि पर्यावरणाला जीवनाशी जोडतात.

जंगलात मछलीची ज्यांची भेट झाली आहे, त्यांनी तिच्या डोळ्यांत जीवनाचे सौंदर्य अनुभवले आहे. ज्यांनी मछलीला पाहिले नाही त्यांनी आज सुंदर-रोमांचक आणि कुतूहल जागवणारी मछलीची छायाचित्रे जरूर पाहावीत. कारण हा फक्त एका वाघिणीचा मृत्यू नाही. आम्ही जंगलातील सर्वात सुंदर ओळख गमावली आहे.
बातम्या आणखी आहेत...