आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madarsa Teacher Asks Students To Sing National Anthem, Banned In Kolkata

कोलकाता: विद्यार्थ्‍यांना शिकवले 'जन गण मन', मदरशाच्‍या शिक्षकाला मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालच्‍या तालपुकूर आरा मदरशातील विद्यार्थ्‍यांना राष्‍ट्रगीत शिकवणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. काही मौलवींनी त्‍यांना इस्‍लाम विरोध ठरवत मारहाण केली. काजी मासूम अख्तर असे त्‍या शिक्षकाचे नाव असून, मौलवींनी त्‍यांच्‍या विरोधात फतवा काढला.
नेमका काय आहे प्रकार ?
प्रजासत्‍ताक दिनाच्‍या तयारीनिमित्‍त शिक्षक अख्तर हे विद्यार्थ्‍यांकडून राष्‍ट्रगीतावर तालीम करून घेत होते. त्‍यामुळे मौलवींनी त्‍यांना मारहाण केली आणि त्‍यांना इस्‍लाम विरोधी ठरवत फतवा काढला.
का आहेत राष्‍ट्रगीताच्‍या विरोधात...
- मौलवींनी अख्‍तर यांच्‍याविरोधात काढलेल्‍या फतव्‍यामध्‍ये राष्‍ट्रगीत (जन गण मन) ला अपवित्र आणि इस्‍लाम विरोधी म्‍हटले.
- यामुळे आमच्‍या धार्मिक दुखावतात असेही म्‍हटले.
- अख्तर हे तालपुकूर आरा मदरशाचे मुख्‍याध्‍यापक आहेत.
- त्‍यांना दाढी करणे आणि जिन्‍स पॅण्‍ट घालण्‍यावरही बंदी घालण्‍यात आली.
- मारपिटीनंतर अख्तर मदरशात गेले नाही. आपल्‍याला सुरक्षा द्यावी अशी मागणी त्‍यांनी केली.
- अख्तर यांना झालेली मारहाण चुकीची आहे, असे जमीयत उलेमाचे उपाध्‍यक्ष मुफ्ती सैयद मिर्जाउद्दीन म्‍हणाले.
यापूर्वीसुद्धा झाली मारहाण
- अख्‍तर यांच्‍यावर पहिल्‍यांदाच हल्‍ला झाला असे नाही तर एप्रिल 2015 मध्‍येही त्‍यांना मारहाण झाली होती. तेव्‍हा प्रकरण एका धार्मिक प्रतीकाशी निगडित होते.
- कोलकाता पोलिस आयुक्‍तांनी या प्रकरणी अल्‍पसंख्‍याक आयोगाच्‍या अध्‍यक्षाला पत्र लिहिले आहे.