आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधुबनी पेंटिंगद्वारे महिला, मुलींनी वृक्षतोड रोखली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुबनी (बिहार) - बिहारच्या मिथिलांचलची ओळख कधी काळी मधुबनी चित्रकलेसाठी होती. मात्र, सध्या येथे मधुबनी झाडांचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी येथे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असे. त्याबाबत तक्रारी केल्यानंतरही त्याला आळा बसला नाही. परिणामी महिला आणि मुलींनी यावर उपाय शोधत मधुबनी पेंटिंगचे शस्त्र उचचले. या महिला, मुलींनी धार्मिक थीमवर मधुबनी चित्रांनी झाडे सजवली. आता एखाद्या वृक्षावर कृष्ण लिला तर एखाद्या झाडावर रामचा दरबार दिसून येतो.

रामपट्टी ते राजगनरच्या पाच किमी क्षेत्रात अशी झाडे दृष्टीस पडतात. रस्त्याच्या दुतर्फा विविध चित्रांनी नटलेली वृक्ष संपदा पाहण्यासाठी लोक आवर्जुन थांबा घेत सेल्फीही काढतात. या यशस्वी प्रयोगामुळे वृक्षतोड थांबली आहे. मधुबनीमध्ये झाडांचे मनमाेहक रुप पाहिल्यानंतर लोक इतरांनाही याची माहिती देत आहेत. चित्रमय वृक्षांमुळे रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. मंगरौनीच्या रहिवासी कुमारी प्रिया, लहेरियागंजच्या ममता झा यांच्यासारख्या डझनभर महिला व युवतींनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. चकदह गावच्या चित्रकार सिया देवी म्हणाल्या, झाडांना देव मानून पूजा केली जाते. लोकांनी कुऱ्हाड चालवून नये यासाठी वृक्ष ईश्वरी लीलांमध्ये सजवण्यात आले.

तीन वर्षंाआधी सुरुवात, यशामुळे सरकारही चकित : येथील स्वयंसेवी संस्था ग्राम विकास परिषदेचे सचिव षष्ठीनाथ झा यांना वृक्षतोड थांबण्यासाठी मधुबनी पेंटिंगची कल्पना सुचली. त्यांनी महिला व मुलींना या मोहिमेत सहभागी करून घेतले. याची सुरुवात २०१३ मध्ये झाली आणि त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. सकारात्मक प्रतिसादामुळे प्रशासनही चकीत झाले आहे. मधुबनीमध्ये पाच किमीचा रस्ता लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. झाडावरील किडे मारण्यासाठी व पांढरा बेस तयार करण्यासाठी खोडाला चुना लावला जातो. यानंतर धार्मिक थीमवर राम,सीता,कृष्ण, बुद्ध किंवा महाविराशिवाय तुळस, पिंपळ, मंदिर आदींचे चित्र काढली जातात. एक चित्र आकारास येण्यास कमीत कमी ५-६ तास लागतात.
बातम्या आणखी आहेत...