आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर टक्के मतदानासाठी अभियान, साप-शिडीतून महिलांमध्ये मतदानाची जनजागृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदसौर - अरे..रे..राधाला साप चावला. खरेच नुकसान झाले आणि का नाही. त्याला कुठेतरी राधादेखील जबाबदार आहे. कारण तिने मतदानाचा हक्क बजावला नाही. त्यामुळे योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यात चूक होऊ शकते. आगामी पाच वर्षांत लोकांना सर्पदंशाच्या घटनांना सामोरे जावे लागू शकते. संगीताला पाहा. ती शिडी चढू लागली आहे. कारण तिने आपल्या मताचा योग्य वापर केला. ती पुढे जाऊ लागली आहे. मतदानदेखील एक खेळ आहे. अगदी साप-शिडीसारखाच. म्हणूनच तो प्रामाणिकपणे व शहाणपणाने खेळण्यातच प्रत्येत मतदाराचा विजय आहे.
स्वीप अभियानाअंतर्गत महिला बालविकास विभागाचे अधिकारी-कर्मचारी साप-शिडीचा खेळ मांडून महिलांमध्ये जनजागृती करू लागले आहेत. हेतू स्पष्ट आहे. शंभर टक्के मतदान ! खेळाच्या माध्यमातून महिलांना मताची ताकद दाखवून देण्याचा हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. चुकीचे मतदान पाच वर्षे कशा प्रकारचे संकट आणू शकते, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न या सापशिडीतून केला जात आहे. म्हणूनच कोणत्याही आमिषाला बळी न पडता तुमचे अमूल्य मत व्यर्थ घालवू नका, असा संदेश त्यातून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना या सोंगट्यातून नेमका संदेश पोहोचवण्याचे काम केले जात आहे.
असा हा खेळ : खेळ पूर्णपणे सापशिडीसारखा आहे. त्यामुळे हा खेळ ग्रामीण भागातील सोंगट्यांचा वापर करून खेळवला जातो. फासे फेकल्यानंतर गोटी कशी सापाच्या तोंडात जाते. मतदान न केल्याचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत. शिडी चढणे याचा अर्थ मतदानाचा फायदा असा सांगण्यात आला आहे. खेळात सुमारे 5 साप व 7 शिड्या आहेत.