आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशच्या पत्रकाराची हत्या, वर्ध्यात आणून जाळला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संदीपचा जळालेला मृतदेह. इनसेट-संदीप कोठारी. - Divya Marathi
संदीपचा जळालेला मृतदेह. इनसेट-संदीप कोठारी.
बालाघाट(भोपाळ) - खाणमाफियांनी मध्यप्रदेशातील पत्रकार संदीप कोठारी याचे अपहरण करून त्याची हत्या केली आहे. विशेष म्हणजे ओळख लपवण्यासाठी त्याचा मृतदेह महाराष्ट्रातील वर्ध्यात आणून जाळण्यात आला. संदीप कोठारी हे वारंवार प्रशासन आणि पोलिसांकडे खाण माफियांच्या तक्रारी करत होते.

पोलिसांनी सांगितले की, संदीपला शुक्रवारी सायंकाळी मॅग्नीजच्या व्यवसायातील उद्योजक राकेश नर्सवानी आणि साथिदारांनी बालाघाटपासून घरी परतताना कटंगी रेलवे स्टेशनजवळ धडक दिली. त्यानंतर संदीप खाली कोसळताच त्याला बळजबरी गाडीत टाकले. तसेच त्यांच्यासोबत असणारे त्यांचे मित्र ललित यांना मारहाण करून पळवून लावले. त्यानंतर ते नागपूरकडे निघाले. अपहरण करणाऱ्यांनी गाडीतच गळा दाबून त्यांची हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याला जाळून टाकण्यात आले. दरम्यान, ललित यांनी संदीप यांच्या अपहरणाची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तर एकजण फरार आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींसह संदीप यांचा अर्धा जळालेला मृतदेहही ताब्यात घेतला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...