आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वी पास मॅकेनिकने बनवली 800 सीसीची बाईक, विद्यार्थ्यांनी तयार केली स्वस्त स्पोर्टस कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदीशामध्ये 5वी पास मॅकेनिक रविंद्र कुमार आपल्या सहकार्‍यांसमवेत....

विदिशा/रांची -
आपल्या देशात नवनिर्मितीस काहीच कमी नाही. मात्र गरज आहे ती म्हणजे प्रेरणेची. एकीकडे मध्यप्रदेशच्या विदिशा येथील एका पाचवी पास मुलाने 800 सीसीची बाईक बनवली आहे, तर दुसरीकडे इंजिनिअरिंग शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने जगातील सर्वात स्वस्त स्पोर्टस कारची निर्मिती केली आहे.
चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या या अदभूत अविष्काराच्या निर्मितीची कथा
बाईकमध्ये लावले आहे मारुती-800 कारचे पार्ट्स...

मध्यप्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात राहणार्‍या 5 वी पास रविंद्र विश्वकर्माने केवळ फोटो पाहून एका हेवी बाईकची निर्मिती केली आहे. या बाईकचे वैशिष्ट्य म्हणजे यातील जास्तकरून पार्ट्स हे मारूती - 800 कारचे, तर चाक हे बोलेरो आणि स्कॉर्पीओचे आहेत.
सामान्य बाईकपेक्षा अत्यंत वेगळ्या प्रकारची ही गाडी लवकरच शहरातील रस्त्यांवर दिसेल.
ऑर्डरवर बनवण्यात आलेल्या या बाईकचा निर्माता रविंद्र विश्वकर्मा हा मुळात एक मॅकेनिक आहे. ही बाईक बनवण्यासाठी त्याला 2 लाख रुपयांचा खर्च आला असून याचे वजन 2.5 क्विंटल एवढे आहे. या बाईकचे टेस्ट ड्राईव्हही करण्यात आले आहे. 5 गिअरच्या या बाईकचे गिअर हाताने आणि पायाने वापरता येतात. तर इंजिनच्या कुलिंगसाठई रेडिएटरसुध्दा लावण्यात आले आहेत.
या बाईकचे चाक कार प्रमाणे सहज फिरतात. ही बाईक पेट्रोलवर चालणार असून तीचा एव्हरेज 20 किमी प्रति लीटर एवढे आहे. या बाईकडे डिझाईन जगप्रसिध्द बाईक कंपनी हार्ली डेव्हीडसनच्या बाईकशी मिळते जुळते आहे. या बाईकची लांबी 8 फीट आहे तर उंची आणि रुंदी 4.4 एवढी आहे. या बाईकचे बॅलेंस एवढे चांगले आहे की, याला स्टॅंडची गरज भारत नाही.

विद्यार्थ्याने बनवली दीड लाखांमध्ये स्पोर्ट्स कार
झारखंडची राजधानी रांची येथील इंजिनिअर सात्विक निकुंज याने आपल्या मित्रांसोबत मिळून एक स्पोर्ट्स कार बनवली आहे. या कारचे नाव त्यांनी एफ वन स्टूडंट कार असे ठेवले आहे. ही कार अत्यंत हलकी आणि स्वस्तसुध्दा आहे. निकुंजच्या का कार्यामुळे त्याचे नाव संपूर्ण रांची समवेत झारखंडमध्ये प्रसिध्द झाले आहे. रांचीच्या बडगाई येथील चित्रगुप्त नगरचा रहिवासी असलेल्या निकुंज जयपूरच्या सुरेश ज्ञान विहार युनिव्हर्सिटीच्या बीटेकच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. निकुंजने त्याच्या 19 मित्रांच्या साह्याने या कारचे डिझाईन बनवले आहे. या कारला बनवण्यास केवळ दीड लाखांचा खर्च आला आहे.,
पुढील स्लाईडमध्ये पहा कशी तयार केली रविंद्रने बाईक