आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Madras High Court News In Marathi, Information Rights, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहिती मागवताना त्याचे कारण स्पष्ट करा, माहिती अधिकारासंबंधी मद्रास हायकोर्टाचा निकाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात पारदर्शक प्रशासनासाठी २००५ मध्ये लागू करण्यात आलेल्या माहितीच्या अधिकारात एखाद्याने माहिती मागवली तर त्या अर्जदाराला ही माहिती मागवण्याचा उद्देश किंवा कारण द्यावेच लागेल. मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात हा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे या कायद्याच्या कलम ६ (२)मध्ये अर्जदाराने कारण देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट नमूद आहे.

न्यायमूर्ती एन. पौल वसंतकुमार आणि न्या. के. रविचंद्राबाबू यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला. ज्या उद्देशाने एखाद्या अर्जदाराने माहिती मागवली असेल त्याच प्रकरणात ती जाहीर केली जावी, असेही न्यायपीठाने नमूद केले.

विनाकारण कुणाला माहिती दिली जात असेल आणि ती माहिती मिळवण्यामागे निश्चित असा उद्देश नसेल तर या कायद्याच्या उद्देशाच्या अनुषंगाने विचार करता अशी माहिती देणे म्हणजे एखाद्या पत्रकापेक्षा वेगळे नाही. माहितीच्या अधिकार कायद्यात नमूद कलम ६ (२)चा मद्रास हायकोर्टाने या निकालात उल्लेखही केलेला नाही. माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींच्या विरोधात हे न्यायपीठ निकाल देत आहे असा याचा कुणी अर्थ लावू नये.
उलट ज्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला आहे, तो साध्य व्हावा, हा विचार यामागे आहे.