आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री दयानिधी मारन यांची अटक अटळ, 3 दिवसांत CBI समोर हजर राहाण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - मद्रास उच्च न्यायालयाने माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांचा अंतरिम जामीन अर्ज रद्द करत तीन दिवसांत सीबीआयसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. दूरसंचार घोटाळ्यात मारन यांच्यावर आरोप आहेत.

न्या. एस. वैद्यनाथन यांनी जामीन अर्ज फेटाळत तीन दिवसांत सीबीआयला शरण जाण्याचे निर्देश दिले. सीबीआयने जामिनास आव्हान दिले होते. दयानिधी २००४ ते २००७ या काळात दूरसंचारमंत्री असताना ३०० पेक्षा जास्त हायस्पीड टेलिफोन लाइन्स त्यांच्या निवासस्थानाला व भावाच्या सन टीव्ही वाहिनीला दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.