आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराष्ट्रपतींच्या पत्नीच्या मदरशात पाण्यातून विष; समाजकंटकांनी टाकलेला डाव फसला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छायाचीत्र
अलिगड- उत्तर प्रदेशातील अलिगड येथे चाचा नेहरू मदरशात शनिवारी मोठी दुर्घटना होता होता टळली. झाले असे की, काही अज्ञात व्यक्तींनी वॉटर कूलरमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर मिसळली आहे, अशी माहिती आठवीच्या मुलांनी प्राचार्यांना  सांगितली. ही पावडर म्हणजे उंदीर मारण्याचे औषध होते, असे नंतर समजले. हा मदरसा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांच्या अल नूर एज्युकेशन सोसायटीद्वारे चालवण्यात येताे. सलमा अन्सारी या ट्रस्टच्या चेअरमन आहेत.  

पोलिसांनी सोमवारी या संदर्भात माहिती देताना सांगितले,  येथील विद्यार्थ्यांनी पाण्यात पावडर मिसळताना पाहिले आहे, असे  काही समाजकंटकांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी पिस्तूल दाखवून कोणाला ही माहिती सांगितल्यास गोळ्या घालून ठार करू, असे या मुलांना धमकावले. त्यानंतर ते पळून गेले. पोलिसांना तेथे कागदाचे तुकडे आढळले. त्यावरून पाण्यात  उंदीर मारण्याचे औषध मिसळले हाेते याची पुष्टी केली. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवळील बदरबाग भागात हा मदरसा चालवण्यात येतो. येथे सुमारे ३५०० मुले शिक्षण घेतात. मदरशात सकाळच्या वेळेत मुले खेळत असताना, काही गुंडप्रवृत्तीची माणसे तेथे आली. मुलांचे लक्ष नाही व आजूबाजूला कोणी शिक्षक उपस्थित नव्हते, हे पाहूनच त्यांनी जवळील एका पुडीतील पावडर वॉटर कूलरच्या पाण्यात टाकली होती. 
 
सलमा म्हणाल्या : शुक्र है हादसा टल गया  
सलमा अन्सारी म्हणाल्या, मी वार्ता कळली तेव्हा सुन्न झाले होते. या निष्पाप मुलांच्या जिवाला धोका करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मुलांनी धाडस दाखवल्यामुळे समाजकंटकांना धडा मिळाला. एक मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणाचा तपास जावेद खान करत असून त्यांनी सांगितले, वॉटर कूलरमधील पाण्याचे नमुने न्यायवैद्यक शाळेत पाठवण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...