आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maggi Controversy Lucknow Samples Too Failed In Fda Lab Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅगी नुकसानकारक आढळल्यास अमिताभ, माधुरी, प्रितीवरही कारवाई : पासवान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मॅगी नूडल्सच्या दर्जामध्ये काही दोष आढळल्यास केवळ कंपनीच नाही, तर प्रचार करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली आहे. कायद्यानुसार कंपनी आणि प्रचार करणाऱ्यांना दंड ठोठावला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. अमिताभ बच्‍चन, माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा हे मॅगीसाठी जाहिराती करतात.

उत्तर प्रदेश फूड सेफ्टी आणि ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (UPFDA) च्या सँपल टेस्टमध्ये मॅगी (नूडल्‍स) फेल झाल्यानंतर केंद्र सरकारची संस्था फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) नेही देशभरात अनेक ठिकाणी मॅगीचे सँपल घेतले आहेत. त्यांचे अहवाल अद्याप आले नसल्याचे पासवान म्हणाले आहेत.

यूपीपाठोपाठ बिहार कोर्टात पोहोचले प्रकरण
मॅगीची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्या विरोधात बाराबंकीमध्ये एका वकिलाने खटला दाखल केला आहे. दरम्यान बिहारच्या मुजफ्फरपूर सीजेएम कोर्टातही एका वकिलाने सोमवारी मॅगीमध्ये जीवघेणी रसायने असल्याप्रकरणी या तिघांवर खटले दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे.

लखनऊमधील सँपलमध्येही दोष
यूपीएफडीएच्या चौकशीत बाराबंकीमधून घेतलेले सँपल दोषी आढळल्यानंतर लखनऊ येथील सँपलही प्राथमिक चाचणीत दोषी आढळून आले आहेत. बाराबंकीमधून घेण्यात आलेल्या सँपलमध्ये मोनो सोडियम ग्लुटामेट आढळले होते. त्यानंतर लखनऊहूनही दोन मे रोजी 13 सँपल घेण्यात आले होते. त्यातही मोनो सोडियम ग्लुटामेट आढळले. या तपासात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

तज्ज्ञांच्या मते मोनो सोडियम ग्लुटामेट 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हानीकारक असते. त्याच्या सेवनाने मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा समावेश असल्याचे तसे जाहीर करणे गरजेचे असते. पण मॅगीच्या पाकिटावर याचा काहीही उल्लेख नाही. हा प्रकार नियमांचे उल्लंघन असल्याचे मानले जात आहे.