आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापरिनिर्वाण दिनी मायावती म्हणाल्या- \'मोदी तर नाही 90 टक्के जनता फकिर-कंगाल झाली\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित रॅलीत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या महायावतींनी मोदींच्या नोटबंदीवर पुन्हा एकदा टीका केली. त्या म्हणाल्या, 'मी फकिर आहे असे म्हणारे मोदी तर फकिर नाहीत, मात्र त्यांनी देशातील 90 टक्के जनतेला फकिर आणि कंगाल करुन टाकले आहे.' समाजवादी नेत्यांचा मायावतींनी समाचार घेतला. महापुरुषांचा आदर सप नेत्यांना करता येत नसल्यचा हल्ला त्यांनी चढविला.

मायावती म्हणाल्या, 'समाजवादी परिवाराने आर्थिक, राजकीय क्षेत्रात जे स्थान मिळविले आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळे. मात्र त्यांना याचा पूर्ण विसर पडला आहे. महापुरुष, गुरु यांच्याबद्दल ते काहीही बरळत आहेत. सपा प्रमुख नेहमीच म्हणत असतात की पार्कमध्ये दगड उभे केले आहेत. हे अतिशय निंदनिय वक्तव्य आहे.' मायावती म्हणाल्या, माझा त्यांना सवाल आहे, जनेश्वर पार्कमध्ये जे उभे आहे ते काय आहे ?

मुख्यमंत्री अखिलेश यांना म्हणाल्या बबुआ...
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना बबुआ संबोधत मायावती म्हणाल्या, बबुआने काही बोलू नये. त्याने आधी स्वतःचे अंतर्मन तपासले पाहिजे.
- मायावती म्हणाल्या, काँग्रेसमुळे मुस्लिम, अल्पसंख्याक समाज उपेक्षित राहिला आहे. काँग्रेससोबतच भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांचे धोरणही या समाजाबाबत उदासिन राहिले आहे.
- मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अडीच वर्षांच्या काळात दिलेल्या आश्वासनापैकी एक चतुर्थांशही काम केलेले नाही. मोदींची हुकूमशाही आणि त्यांच्या षडयंत्रांपासून सावधर राहाण्याचा सल्ला मायावतींनी दिला.
- त्या म्हणाल्या, लोकांच्या डोळ्यात धुळफेक सुरु आहे. आता भाजपने खासदारांचे अकाऊंट डिटेल्स मागितले आहे.

बबुआला हत्ती स्वप्नात दिसतो
- मायावती म्हणाल्या, समाजवाती सरकारच्या प्रमुखाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आस्था नाही. जर त्यांना आस्था असती, तर त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची आणि महापरिनिर्वाण दिनाची सुटी कधी दिली कधी नाही, असे केले नसते. यावरुन लक्षात येते के ते अजून 'बबुआ'च आहेत.
- अखिलेश त्यांच्या छोट्या-छोट्या कार्यक्रमांमध्येही हत्तीचे गुणगाण गातात. बसपाचा हत्ती त्यांना स्वप्नातही सतावत असणार.
- मायावती म्हणाल्या, राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी पार्क तयार केले गेले. त्याला अखिलेश विनाकारणचा खर्च म्हणत आहेत. त्यासोबतच मायावतींनी सपाच्या सैफई महोत्सव कोणासाठी असतो, असा सवाल करुन यादव कुटुंबाच्या करमणुकीसाठी राज्याचा पैसा वाया घालवला जात असल्याचा आरोप केला.

भाजप-संघाला बाबासाहेबांचे संविधान आवडत नाही
- बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या, आपल्या देशात दलित, मागसवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक लोकांना फार संगर्ष करावा लागला आहे.
- या समाजातील लोकांना संरक्षण मिळावे यासाठी बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षतेवर आधारित संविधान निर्माण केले. आज आपण सर्व सुरक्षित आहोत त्याची देण बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे.
- भाजप आणि आरएसएसच्या लोकांना हे संविधान आवडत नाही. त्यांचे संविधान बदलाचे षडयंत्र सुरु आहे. तुम्हाला यापासून सावध राहिले पाहिजे.

सपा सरकारच्या काळात कायदा-सुव्यवस्था बिघडली
- मायावती म्हणाल्या, लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वे खऱ्या अर्थाने बसपची देण आहे. मात्र समाजवादी ते आमचे कतृत्व असल्याचा डांगोरा पिटत आहेत.
- उत्तर प्रदेशातील जनता दुःखी आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था नावाची गोष्टच राहिलेली नाही.
- मायावती म्हणाल्या, राज्यातील सध्याच्या सरकारने ज्या पीडितांचे एफआयआर दाखल करुन घेतले नाही, त्यांचे एफआयआर दाखल करुन घेतले जातील आणि दोषिंवर कारवाई देखिल होईल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मायावतींच्या सभेला झालेली गर्दी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...