आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीमध्ये बिघाडी, राष्ट्रवादी जागांवर अडून: अवमान केल्याची भावना : अन्वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटिहार- बिहारमध्ये लालू-नितीशकुमार यांच्या धर्मनिरपेक्ष महाआघाडीत बिघाडी झाली आहे. जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर निषेध केला. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची ३ जागांवर बोळवण केल्याबद्दल पक्षाचे सरचिटणीस तथा कटिहारचे खासदार तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जागा वाटपांत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. त्यावरून नीतिश आणि लालू यांना मुस्लिम-दलित मतांची गरज नसावी, असे यावरून दिसते. परंतु राष्ट्रवादी बिहारमध्ये १२ जागांपेक्षा कमीच्या प्रस्तावावर कदापिही तडजोड करू शकत नाही. अन्वर पुढे म्हणाले, जागा वाटपावरून राष्ट्रवादी महाआघाडीतील सहकारी पक्ष नसल्याचा संदेश जातो. विना दलित आणि मुस्लिम मतांशिवाय ही महाआघाडी सांप्रदायिक शक्तीचा मुकाबला कसा करू शकेल ? राष्ट्रवादीचे सीमांचल आणि पूर्व बिहारच्या अनेक जिल्ह्यात अस्तित्व दिसून येते.१६ ऑगस्ट रोजी पाटण्यात पक्षाने आपले नेते, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील रणनिती ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पक्षाचा प्रभाव असल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला धक्का बसू शकतो, असे संकेत देण्याचा प्रयत्न केला.