आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अडीच हजार वर्षांपासून शांतीचा संदेश देत आहे महाबोधी विहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाला शांतीचा संदेश देणा-या भगवान बुद्धांच्या ज्ञानभूमीत- बुद्धगया येथे रविवार सकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान नऊ साखळी बॉम्बस्फोट झाले. यात पाच बौद्ध भिख्खू जखमी झाले असून दोघांची स्थिती गंभीर आहे. चार बॉम्बस्फोट महाबोधी मंदिर परिसरात झाले. पाचवा स्फोट मंदिर परिसरातील 80 फूट उंच बुद्ध मुर्तीजवळ झाला. सहावा स्फोट कर्मापा मंदिराजवळ आणि बाकीचे तीन मंदिराच्या आसपास झाले. मंदिर परिसरात दोन जिवंत बॉम्बही सापडले आहेत. ते निकामी करण्यात आले.

अडीच हजार वर्षांपासून या भूमीने विश्वाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला आहे. त्याच भूमीत हिंसा घडविण्याचा प्रयत्न करणा-यांचा सर्व स्थरातून निषेध होत आहे.