(छायाचित्र: महाराज भूपिंदर सिंग सिंहाची शिकार केल्यानंतर)
अमृतसर- सध्या काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार लढाई सुरु आहे. पंजाबमधील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सतत होत आहेत. पंजाबचे माजी सीएम कॅप्टन अमरिंदर सिंह आणि काँग्रेस प्रमुख यांच्यातील वाद पक्षाध्यक्ष सोनिया यांच्यापर्यंत पोहचला आहे. काही दिवसापूर्वी अमरिंदर सिंह सोनिया यांना भेटून प्रदेशाध्यक्ष बाजवा यांना हटविण्याची मागणी केली आहे. बाजवा यांना हटवून कॅप्टन स्वत: पंजाब काँग्रेसचे प्रमुख बनू इच्छित आहेत. याच कारणासाठी त्यांनी सर्व आमदारांना लंचला बोलावले होते. कॅप्टन पंजाबचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेतच पण त्याचबरोबर पटियाला राजघराण्याचे राजासुद्धा आहेत. पटियाला राजघराण्याचा इतिहास खूपच जुना व रंजक आहे. आज आम्ही तुम्हाला या शाही राजघराण्यातील सर्वात चर्चित महाराज आणि अमरिंदर सिंह यांचे आजोबा महाराजा भूपिंदर सिंग यांच्याबाबत माहिती देणार आहोत...
महाराजा भूपिंदर सिंग
पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांचा जन्म पटियालामधील मोती बाग पॅलेसमध्ये झाला. त्यांचे शिक्षण पाकिस्तानमधील लाहोरमधील एचिसन कालेजमध्ये झाले.
आपले वडील पिता महाराजा राजिंदर सिंग यांच्या निधनानंतर 9 वर्षांनी भूपिंदर सिंग यांना पटियालाचे राजा म्हणून घोषित करण्यात आले. 1 ऑक्टोबर 1909 रोजी महाराज भूपिंदर सिंग 18 वर्षाचे झाल्यानंतर 3 नोव्हेंबर 1910 मध्ये तत्कालीन वाईसराय याने त्यांना मान्यता दिली होती. महाराजा भूपिंदर सिंग आपली छानदार व आरामदामी जीवनशैली जगण्याबाबत ओळखले जायचे. ते पहिले भारतीय होते ज्यांच्याकडे विमान होते. एवढेच नव्हे तर त्यांना कारगाड्यांचा शौक होता. त्यांच्या ताफ्यात 20 रॉल्स रॉयल्स कार होत्या.
रॉल्स रॉयल्सने वाहिला होता कचरा-
महाराजा ऑफ पटियाला भूपिंदर सिंग रॉल्स रॉयल्सच्या शोरुममध्ये कारच्या सर्वात उच्च मॉडेलची चौकशी करण्याकरिता गेले होते. तेव्हा शोरुममधील सेल्समॅनने त्यांना म्हटले होते की तुम्ही ही कार खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या भूपिदंर सिंग यांनी शोरुममध्ये ठेवलेल्या सर्व कार खरेदी केल्या व आपल्या नगरीत त्या कारवरील छत काढत कचरा टाकण्यासाठी वापरायला सुरुवात केली.
कोट्यावधीचा होता महाराजांचा डायनिंग सेट-
आपल्या शानदार जीवनशैलीमुळे महाराजा भूपिंदर सिंग सर्वोत्तम वस्तू वापरण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या डायनिंग सेटमध्ये 166 काटेचमचे, डेजर्टचे 111 काटेचमचे, 111 चमचे, 21 मोठे चमचे, सूप पिण्यासाठी वापरले जाणारे 37 चमचे, सलाड वाढण्यासाठीचे सहा ताठे, चिमटयाचे सहा जोड, भाजी कापण्यासाठी कात्रींचे आधुनिक तीन जोड, 107 स्टीलचे ब्लेड चाकू, याचबरोबर फळे व इतर कामांसाठी वापरले जाणारे 111 चाकूचा डायनिंग सेटमध्ये समावेश होता.
पुढे स्लाईडच्या माध्यमातून पाहा, महाराज भूपिंदर सिंग यांच्या रॉल्स रॉयल्स आणि आरामदायी जीवनशैलीचे PHOTOS…