आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या किल्‍ल्‍यात झाला महाराणा प्रतापांचा जन्‍म, चीन नंतर सर्वात मोठी भिंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - राजस्थान म्‍हटले की आपल्‍या समोर उभे राहतात ते लढवय्ये राजे आणि रणांगण. या प्रदेशातील अनेक यौद्धाचा भारतीय इतिहासात आदराने उल्‍लेख आहे. यापैकीच एक म्‍हणजे महाराणा प्रताप. त्‍यांना राजस्‍थानची अस्मिता म्‍हटले तर वावगे ठरणार नाही. उदयपूर जवळ असलेल्‍या कुम्भलगड किल्‍ल्‍यात त्‍यांचा जन्‍म झाला. हा किल्‍ला मेवाडची संकटकालीन राजधानी होता. महाराणा कुंभापासून ते महाराणा राज सिंह यांच्‍या काळापर्यंत मेवाडवर झालेल्‍या आक्रमाणांच्‍या काळात राजपरिवार याच किल्‍ल्‍यात राहिला. 19 ते 25 नोव्‍हेंबरदरम्‍यान जागतिक पर्यटन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे या किल्‍ल्‍याविषयी विशेष माहिती...
'प्रेम रतन धन पायो'ची शूटिंग झाली
सूरज बडजात्या दिग्‍दशर्शित राजश्री प्रोडक्शनच्‍या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटातील काही दृश्‍यांचे चित्रकरण या किल्‍ल्‍यात झाले. तीन दिवस येथे शूटिंग चालली. चित्रपटातील एका गाण्‍यात या किल्‍ल्‍यातील तोपखाना चौक, यज्ञ वेदीच्‍या जवळ असलेली भिंत आणि भैरव पोल दाखवण्‍यात आले.
चीनच्‍या भिंतीनंतर हीच भिंत
या किल्लाच्याभोवती विराट आणि अभेद्य अशी भिंत आहे. तिची लांबी तब्‍बल 36 किमी असून, जगात चिनच्‍या भिंतीनंतर हीच भिंत सर्वात मोठी आहे. एवढेच नाही चीनच्‍या भिंतीप्रमाणे ही भिंतसुद्धा चंद्रावरून दिसते असे म्हणतात. या भिंतीवरून एकावेळी सात घोडेस्वार धावू शकतात. आत चार गावे आणि कुम्भालगढ किल्ला यांना संरक्षण देत ही भिंत दिमाखाने उभी आहे. दगड आणि चुना यांनी बनविलेली ही भिंत अंतराअंतरावर गोलाकार बुरूज आणि दरवाजे (पोल) यांनी सुशोभित आहे. अरट पोल, हल्ला पोल, हनुमान पोल आदी महत्त्वाचे पोल आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कशी बांधली एवढी मोठी भिंत ?