आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रॉयल पॅलेसमध्ये नववधू बनून आली होती जगातील सर्वात सुंदर महाराणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामबाग पॅलेस - Divya Marathi
रामबाग पॅलेस
जयपूर - रामबागच्या हवेतच काही जादू होती, परीकथेतील हे महल कधीकाळी आमचे सुंदर, अल्हाददायक आणि मोकळा श्वास घ्यावा तो येथेच असे निवासस्थान होते. रामबागमध्ये मी नव्या नवरीच्या रुपात आले आणि माझे अर्ध्याहून अधिक आयुष्य या घरात गेले. जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक असलेल्या दिवंगत राजमाता गायत्री देवी यांचे हे शब्द आहेत. रामबागबद्दल त्यांच्या मनात किती आस्था आणि आपुलकी होती हे यातून दिसून येते.

हे पॅलेस जयपूर राजघराण्याची राजमाता आणि जगातील सर्वांत सुंदर स्त्रियांमध्ये गणल्या जाणाऱ्या गायत्री देवींचे घर होते. मात्र त्यांच्यानंतर संपत्तीच्या वादावरुन आता त्यांची नातवंडे देवराज आणि लालित्या या जयपूर पॅलेसमधील वडिलांच्या हिस्सेदारीवरुन कोर्टात गेले आहेत. आज आम्ही चर्चा करत आहोत अशा पॅलेस विषयी जे स्वातंत्र्यानंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये रुपांतरीत झाले आहे.

स्वातंत्र्याआधीचे पॅलेस
या शाही पॅलेसचे निर्माण 1935 मध्ये जयपूरचे महाराज मानसिंह यांनी केले होते. या पॅलेसच्या डिझाइनसाठी महाराजांनी त्याकाळातील प्रसिद्ध डिझायनर सॅम्यूअल स्विंटन जेकबची निवड केली होती. त्यानंतर जेकबने जी कलाकृती तयार केली ती आजही लक्षवेधी ठरते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1957 मध्ये या पॅलेसचे रुपांतर पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले आहे.
पॅलेसमध्ये 79 शाही रुम्स
या लक्झरीअस हॉटेलमध्ये 79 शाही रुम्स आणि स्विट आहेत. यांचे सौंदर्य पाहाताक्षणीच नजरेत भरणारे आहे. या शाही रुम्सच्या भिंती मुगल काळातील नक्षीने अधिक खुलून दिसतात. हे पॅलेस त्याच्या हिस्टॉरिकल स्विट, रॉयल स्विट आणि ग्रँड रॉयल स्विटमुळे जगप्रसिद्ध आहे. या स्विटमध्ये लक्झरी लाइफ्या सर्व गरजांची पूर्तता केलेली दिसून येते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, या पॅलेसचे सौंदर्य जे आज पंचतारांकित हॉटेलमध्ये बदलले