लखनऊ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि दिग्विजयसिंह हे दोघे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात कारस्थान रचत आहेत, असा आरोप पक्षाचे नेते बेनीप्रसाद वर्मा यांनी केला आहे. राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हे दोघे काँग्रेसला कमजोर करत असल्याची टीकाही वर्मा यांनी केली आहे. एवढेच नाही तर प्रादेशिक नेत्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्लाही त्यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
उमेदवार ठरवण्याचे काम हे प्रादेशिक नेतेच करतात, पण अपयश आले की, राहुल यांच्यावर खापर फोडले जाते, असे बेनीप्रसाद यांनी म्हटले आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर राहुल बोलले असते तर काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या असत्या, असे दिग्विजय यांनी म्हटले होते, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल यांच्या गप्प बसण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.