आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूगोल विषयाच्या पुस्तकातील अरुणाचल प्रदेशच्या नकाशात होणार दुरुस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटानगर - राज्य शिक्षण विभागातर्फे प्रकाशित भूगोल विषयाच्या पुस्तकातील अरुणाचल प्रदेशचा चुकीचा नकाशा दुरुस्त केला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. इयत्ता दहावीच्या भूगोलमध्ये चुकीचा नकाशा छापण्यात आला आहे. सरकारने पुस्तकातील दुरुस्ती प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात येते.


विद्यार्थ्यांना पुस्तकाची सुधारित प्रत त्यांच्या शाळेत उपलब्ध करून दिली जात आहे. चुकीचा नकाशा असलेले पुस्तक विद्यार्थ्यांना मिळू नये यासाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. चुकीच्या नकाशाचे पुस्तक मंजूर करणारे पाठ्यपुस्तक मंडळ बरखास्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे. या राज्याचा सांस्कृतिक वारसा व देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. असे चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याआधी तुकी यांनी 17 मे रोजी चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात नकाशात दुरुस्ती करण्यासाठी स्वत: लक्ष घालण्याची विनंती केली होती.