आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेळगाव- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बेळगावमध्ये तमाम राष्ट्रीय पक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काही पक्षांनी विकासाला महत्व दिले आहे तर काहीनीं मराठी अस्मितेचा भावनिक मुद्दा पुढे केला आहे. बेळगावसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार असून या यंदा कधी नव्हे ती महाराष्ट्र एकीकरण समितीची 'एकी' दिसून येत आहे. अर्थात त्यात काही ठिकाणी अपवाद आहे. परंतु, ही एकी प्रत्यक्षात किती फायद्याची ठरेल हे येणारा काळच ठरवेल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता 3 मे रोजी होणार आहे. या कालावधीत बेळगाव आणि परिसरात होणा-या काही वेगळया आणि महत्वपूर्ण घटनांचा आढवा आजपासून या सदरात घेतला जाणार आहे.
बेळगाव कर्नाटक राज्यातील अत्यंत महत्वपूर्ण असा जिल्हा आहे. महाराष्ट्रातून आलेल्या नवख्याला आपण कर्नाटकमध्ये आलोय असे वाटणारच नाही. कारण येथे सर्रास मराठी भाषा बोलली जाते. तसेच दुकानांवरही मराठी पाट्या दिसतात. बेळगाव जिल्ह्यामध्ये विधानसभेचे एकूण 18 मतदार संघ आहेत. उल्लेखनीय म्हणजे, कर्नाटकातील सर्वाधिक मतदार संघ असलेला हा जिल्हा आहे. सीमाप्रश्नासाठी लढत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने (मए समिती) पाच मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. या पाच मतदारसंघात 3 जागा या भाजपकडे तर 2 जागा कॉंग्रेसकडे आहेत. बहुतांश ठिकाणी एकी झाल्यामुळे यावेळी समितीचा आमदार विधानसभेत जाईल अशी मोठी चर्चा येथे सुरू आहे. भाजपमधून मोठा आकाडतांडव करून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा यांच्या कर्नाटक जनक्रांती पक्षाला येथे नगण्य स्थान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.