आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtravadi Gomantak Party News In Marathi, Congress, Divya Marathi

महाराष्‍ट्रवादी गोमंतकच्या मंत्र्यांची हकालपट्टी करा, कॉंग्रेसची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - बिकिनीसंदर्भात वारंवार विधाने करून गोव्याची प्रतिमा बदनाम करणा-या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदारांची सरकारातून हकालपट्टी करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसकडून रविवारी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकरांनंतर सहकारमंत्री दीपक ढवळीकर व दोनच दिवसांपूर्वी आमदार लवू मामलेदार यांनी बिकिनीसंदर्भात विधाने केल्यामुळे देशपातळीवर राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केला.
यामागे काहीतरी षड्यंत्र असून तब्बल दोन वर्षे म. गो. आमदार, मंत्री गप्प का होते, असा प्रश्न त्यांनी केला आहे. केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर या पक्षाने हिंदुत्व, बिकिनी बंदीसंदर्भात विधाने सुरू केली आहेत याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे. ढवळीकर बंधूंच्या लागोपाठ केलेल्या विधानामुळे गोव्याची आधीच जगभर प्रतिमा डागाळली. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी त्यांना वादग्रस्त विषयावर न बोलण्याचा सल्ला दिला होता.

स्वतंत्र बीचची मागणी
आमदार मामलेदार यांनी पटायाच्या धर्तीवर गोव्यात स्वतंत्र बिकिनी समुद्रकिनारा जाहीर करा, तेथे जाण्यासाठी हजार-दीड हजाराचे शुल्क लागू करा, अशी सूचना विधानसभेत चर्चेवेळी केली होती. मामलेदार यांच्या विधानामुळे पुन्हा गोव्याची प्रतिमा वादग्रस्त बनली असून अशा वेळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या आमदार, मंत्र्यांची तत्काळ सरकारमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.