आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खून झाला नसता तर येथे आले असते बापू, रेल्वेचे तिकीटही होते बुक; पाहा दुर्मिळ Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बापूंनी याच आश्रमात दीर्घकाळ वास्तव्य केले. - Divya Marathi
बापूंनी याच आश्रमात दीर्घकाळ वास्तव्य केले.
सेवाग्राम (वर्धा) - 2 ऑक्टोबर महात्मा गांधींचा जन्मदिवस आहे. महाराष्ट्रातील सेवाग्राममध्ये अनेक वर्षे महात्मा गांधींचे वास्तव्य होते. येथे "बापू कुटी" आश्रम महात्मा गांधींशी निगडित देशातील बहुतेक एकमेव आश्रम आहे. येथे त्यांच्या वस्तू जशाच्या तशा जतन करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्षे झाली तरी हा आश्रम आजही जवळपास जशाच्या तसाच आहे. तथापि, 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या जर झाली नसती, तर ते वर्धाला आले असते. त्यांचे रेल्वेचे तिकीटही बुक केलेले होते.
 
वर्धामध्ये केव्हा राहायला आले होते महात्मा...
गांधीजी 1934 मध्ये वर्धामध्ये आले होते. अगोदर ते शहराच्या मधोमध मगनवाडीमध्ये राहत होते. यानंतर 1936 मध्ये सेवाग्रामध्ये आले. हे गाव वर्ध्यापासून 8 किमी अंतरावर आहे.
- सेवाग्राममध्ये तब्बल 300 एकरावर आश्रम आहे. याला बापू कुटी नावाने ओळखले जाते. आश्रमात लहान-मोठ्या अनेक झोपड्या आहेत. यात बापू आणि त्यांचे सहकारी राहायचे.
- किचन, झोपण्यासाठी, ऑफिस, बैठक इत्यादींसाठी वेगवेगळ्या जागेचा वापर व्हायचा. बापूंच्या जयंतीनिमित्त Divyamarathi.com ला संशोधक भवानीशंकर मिश्र यांनी वर्धाहून बापू कुटी आश्रमाचे काही फोटोज शेअर केले आहेत.
 
एका संकल्पामुळे वर्धा येथे राहायला आले होते गांधी
- महात्मा गांधी फक्त एका संकल्पामुळे राहायला आले होते. वास्तविक, 1930 मध्ये साबरमती आश्रमातून दांडी यात्रेवर गेलेल्या गांधींनी हा संकल्प केला होता की, जेव्हा या देशाला इंग्रजांपासून स्वतंत्र करीन तेव्हाच परत साबरमती आश्रमात पाऊल ठेवीन.
- यानंतर 3 वर्षे ते जेल आणि आंदोलनांत व्यग्र राहिले. स्वातंत्र्य मिळाले नाही म्हणून ते साबरमती आश्रमात परतले नाहीत आणि मध्य भारतात कुठेतरी आश्रम उभारण्यावर विचार करू लागले. जमनालाल बजाज यांच्या आग्रहावरून बापू वर्धा येथे राहायला आले.
 
लोकांना फेरबदल पसंत नाही
- आश्रमाशी निगडित लोकांना वाटते की, बापूंच्या सर्व वस्तूंमध्ये कोणताही फेरबदल होऊ नये. तसे पाहिले तर या आश्रमाशिवाय वर्धामधील अशा 26 जागा आहेत जेथे गांधीजींचा विशेष स्नेह राहिला आहे.
- महाराष्ट्र शासनाने यासाठी एक परियोजनाही सुरू केलेली आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, गांधींशी निगडित प्रत्येक स्थळ वर्धाच्या टुरिस्ट मॅपमध्ये जोडले जावे. सरकारी योजनेअंतर्गत आश्रमाजवळ एक बगिचाही विकसित केला जाणार आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी दुर्मिळ Photos...
बातम्या आणखी आहेत...