आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनैद हत्याकांडाचे कारण बीफ वाद नाहीच, पोलिसांचा दावा; महाराष्ट्रात नोकरी करत होता...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्य आरोपीला बाईकवरून पळ काढण्यास मदत करणाऱ्या दोघांनाही शुक्रवारी अटक करण्यात आली. - Divya Marathi
मुख्य आरोपीला बाईकवरून पळ काढण्यास मदत करणाऱ्या दोघांनाही शुक्रवारी अटक करण्यात आली.
धुळे / फरीदाबाद - हरियाणातील फरीदाबाद येथे चालत्या ट्रेनमध्ये झालेल्या जुनैद हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील धुळे येथून जीआरपीने मुख्य आरोपीला अटक केली. गव्हर्नमेंट रेलवे पोलिस (जीआरपी) ने रविवारी दिलेल्या माहितीप्रमाणे, हे प्रकरण बीफ वादावरून नाही तर केवळ जागेच्या वादावरून झाले होते. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी दोघांना शुक्रवारी अटक झाली होती. त्यांनीच मुख्य आरोपीला बाईकवर पळून जाण्यास मदत केली होती. 
 
 
मारेकऱ्याला अवघ्या 4 दिवसांत नोकरी मिळाली
जीआरपीने महाराष्ट्रातून ज्या मुख्य आरोपीला अटक केली तो 30 वर्षीय युवक आहे. चालत्या ट्रेनमध्ये जुनैदची हत्या करणाऱ्या या मुख्य आरोपीला घटनेनंतर धुळ्यातील एका कारखान्यात नोकरी मिळाली होती. सुरुवातीला तो मथुरा आणि वृंदावन येथील आपल्या नातेवाईकांकडे लपला होता. यानंतर त्याने महाराष्ट्रातील नातेवाईकांशी संवाद साधला आणि त्याला धुळे येथे अवघ्या 4 दिवसांत नोकरी सुद्धा मिळाली. हत्याकांडपूर्वी तो दिल्लीत सिक्यॉरिटी गार्ड म्हणून नोकरी करत होता.
 
 
आरोपींमध्ये एक सरकारी कर्मचारी
- जीआरपीने प्रसिद्धीपत्रकात सांगितले, की जुनैद हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी महाराष्ट्रातील धुळे शहरात लपल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांचे एक पथक तेथे पाठवण्यात आले आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कोर्टात सादर करून पोलिस रिमांडची मागणी केली जाणार आहे. 
- वृत्तसंस्थेच्या माहितीप्रमाणे, या हत्याकांडात अटक करण्यात आलेल्यांपैकी एक आरोपी दिल्लीच्या 50 वर्षीय नागरिकाचा देखील समावेश आहे. तो एक सरकारी कर्मचारी आहे. 
 
 
काय आहे प्रकरण?
- हरियाणातील एका गावात राहणारा 16 वर्षीय जुनैद आणि त्याचे दोन भाऊ हासिम आणि साकिर एका मित्रासोबत दिल्लीत ईदच्या खरेदीसाठी गेले होते. 22 जून रोजी तेथून घरी येत असतानाच ते दिल्ली-मथुरा ईएमयू शटल रेलवेत चढले. ज्या डब्यात ते बसले होते, त्यामध्ये गर्दी नव्हती. म्हणून ते लूडो खेळत बसले.
- तुगलकाबाद रेलवे स्टेशनवर गाडी थांबली असता तेथून 25-30 लोकांचा समूह रेलवेत चढला. यापैकी काहींनी या तिघांना खेळणे बंद करून उठून जागा देण्यास सांगितले. मात्र, साकिर, हासिम, जुनैद आणि मौसिम यांनी जागा सोडण्यास नकार दिला. यावरून अख्खा डबा त्या या चौघांवर बरसला आणि भांडण सुरू झाले.  
- यानंतर चौघांना बल्लभगड रेलवे स्टेशनवर उतरणार होते. स्टेशनवर उतरण्याचा प्रयत्न करताच रेलवेतील संतप्त जमावातून एकाने चाकू काढून जुनैदवर सपा-सप वार केले. जुनैदच्या भावांवरही वार करण्यात आले. मात्र, सर्वात जास्त वार एकट्या जुनैदला बसले. 
- त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी खासगी माध्यमांशी बोलताना जुनैद आणि त्याचे भाऊ बीफ घेऊन जात होते अशी अफवा डब्यात पसरवण्यात आल्याचा दावा केला. बीफचे नाव ऐकूणच जमाव हैवाण झाला होता असेही माध्यमांनी सांगितले. पोलिसांनी मात्र, हा केवळ जागेचा वाद असल्याचे सांगितले आहे. 
- दरम्यान, असावटी रेलवे स्टेशनवर हल्लेखोर ट्रेनमधून उडी मारून फरार झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौघांना रुगणालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, यात जुनैदचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...