आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एवढा भीषण अपघात, हायवेवर पडला मृतदेहांचा खच, किंकाळ्या अन् आक्रोश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंडवाडा (राजस्थान) - दोन नॅशनल हायवेच्या टर्निंग पॉइंटवर एका मोठ्या चुकीमुळे बुधवारी पहाटे अहमदाबादहून रामदेवराकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांनी भरलेली बस रिव्हर्स येणाऱ्या ट्रकमध्ये घुसली. अपघात एवढा भयंकर होता की, बसच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या आणि एका महिलेसह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 18 जण गंभीर जखमी झाले. दुसरीकडे, उपचारांदरम्यान आणखी एका महिलेने दम तोडला.
 
अपघातानंतर मोठा आवाज झाला आणि किंकाळ्या...
बसमध्ये स्वार प्रवासी लीला बेन म्हणाल्या, मंगळवारी रात्री 10 वाजता साणंदहून बस रवाना झाली. सकाळी 4.30ला जोरात आवाज झाला आणि आम्ही सीटच्या खाली पडलो. मग चहुबाजूंनी किंकाळ्या सुरू झाल्या. काहीच कळत नव्हते. काही वेळाने काही लोक आले आणि आम्हाला बसमधून बाहेर काढले.
- दुसऱ्या प्रवासी भिकी बेन म्हणाल्या, रात्री बस साणंदहून निघाल्यावर सर्व प्रवासी झोपलेले होते. पहाटे अचानक मोठा आवाज झाला आणि अख्खी बस हिंदकळली. खूप जण जखमी झाले होते, बसच्या तर चिंधड्या उडाल्या होत्या. मेलेल्यांची माहिती नंतर कळली.
- दुर्घटनेनंतर हायवेवर एका बाजूने ट्रॅफिक जाम लागला होता. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा केला.
 
कसा झाला अपघात...
गुजरातच्या साणंद अहमदाबादहून महिलांचा एक ग्रुप बसने रामदेवराकडे जात होता.  
येथे दोन नॅशनल हायवे एकमेकांना जोडले जातात. परंतु येथील दिशादर्शक बोर्ड एवढा छोटा आहे की, बऱ्याचदा ड्रायव्हरला दिसत नाही. बुधवारीही याच कारणामुळे हा अपघात झाला. रात्री बोर्ड न दिसल्याने एक ट्रक चुकीच्या रस्त्यावर गेला होता. यानंतर बसही चुकीच्या रस्त्यावर गेली. मग अगोदरचा ट्रक रिव्हर्स येऊ लागला होता, यामुळे मागून येणारी बस त्यात घुसली आणि 3 जण प्राणाला मुकले.
 
मदतीसाठी धावले लोक
- बुधवारी पहाटे अजारी फाटकाजवळ भयंकर अपघात झाल्याचे पाहून जखमी आणि त्यांच्या साथीदारांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी आणि सोशल ग्रुप्सनी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भीषण अपघाताचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...