आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघातात दरीत कोसळली बस, असे फसले होते मृतदेह अन् जखमी, प्रवाशांनी केला आक्रोश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगडच्या बिलासपूरपासून 50 किमी अंतरावरील बंजारी घाटात एक बस अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी पेंड्रा आणि गौरेला येथे दाखल करण्यात आले आहे.

 

प्रवासी म्हणाले- ड्रायव्हर आणि क्लीनरने प्यायले होते मद्य
- प्रवासी म्हणाले, बसमध्ये कोंबून-कोंबून प्रवासी भरले होते. ड्रायव्हर आणि क्लीनर दारू प्यायलेले होते. ज्या वेळी अपघात झाला त्या वेळी ड्रायव्हर दारूच्या नशेत होता. अपघातातील जखमींपैकी 2 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये एक महिलाही सामील आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्यांनी रुग्णालयात हलवले.
-अलाहाबादहून बस ओडिशासाठी रवाना झाली होती. यात बहुतांश प्रवासी ओडिशाचेच एकाच कुटुंबातील होते, ते आपल्या नातेवाइकांच्या अस्थी विसर्जनासाठी अलाहाबादला आले होते. याशिवाय काही प्रवासी जांजगीर, तखतपूर, मुंगेली, रागड आणि बिलासपूरच्या बसमध्ये स्वार होते. बस बंजारी घाटात पोहोचताच नशेत तर्रर झालेल्या ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटून दरीत कोसळली. अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते, यामुळे काही वेळासाठी कुणालाच काय झाले ते कळले नाही.

- डॉ. बी.बी. बोर्डे म्हणाले, अपघाताची माहिती मिळताच सर्वांना अलर्ट राहण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 36 जण जखमी आहेत. जखमींना सिम्स, पेंउ्रा, व गौरेला येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. 

 

ढाब्यावर जेवण केले होते
- बसमध्ये स्वार प्रवाशांनी सांगितले की, पहाटे 
3 वाजता ड्रायव्हरने बस एका ढाब्यावर थांबवली होती. येथे सर्वांनी जेवणे केली. यादरम्यान ड्रायव्हर काही लोकांना म्हणालाही की पहाटे 5.30 वाजता बिलासपूरला पोहोचवून देईन. परंतु त्या आधीच हा अपघात झाला. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनीच 108 रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...