आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Major Ceasefire Violation Along International Border; 2 Civilians Killed, 4 Injured

पाकचा नापाक पवित्रा कायम, शस्त्रसंधीला तुडवले पायदळी, गोळीबारात वडील-मुलगा मृत्युमुखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे सीमाभागातील घरांवर झालेल्या गोळ्यांच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत.)
जम्मू : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री उशिरा पाकिस्तानकडून अनेक भारतीय चौक्यांवर बेछूट गोळीबार करण्यात आला असून, त्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला तर एका जवानासह पाचजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काश्मीरच्या कुपवाडा येथेही एका घरात तीन ते चार दहशतवादी घुसल्याचे वृत्त आहे. त्यांच्याबरोबरही चकमक सुरू आहे.
पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे परिसरातील गावांमध्ये तणाव असून अजूनही काही प्रमाणात गोळीबार सुरू असल्याचे वृत्त आहे. रात्री 1 वाजेच्या सुमारास या गोळीबाराला सुरुवात झाली असल्याचे सुत्रांनी कळवले आहे.
अरनिया, आरएस पुरा यासह काही परिसरांमध्ये असणा-या गावांमधील भारतीय चौक्यांवर सातत्याने हा गोळीबार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या सुमारे 22 चौक्यांना लक्ष्य करून हा गोळीबार केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

या गोळीबारात मृत झालेल्या 2 नागरिकांसह पाच जण जखमी असून हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. तसेच जखमींमध्ये बीएसएफच्या एका जवानाचाही समावेश आहे.
एलओसीवर सापडले भुयार
जम्मू-काश्मीरच्या पालनवाला सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ 50 मीटर लांबीचे एक भुयार आढळले आङे. हे भुयार पाकव्याप्त काश्मीरजवळ आहे. त्यामुळे या भुयाराचा वापर शस्त्राच्या वाहतुकीसाठी होत असल्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे.
किरण रिजिजू आज लद्दाखमध्ये
केंद्रीय गृह राज्य मंत्री किरण रिजिजू शनिवारी जम्मू-काश्मीरच्या लद्दाखमध्ये चीनच्या सीमेला लागून असलेल्या परिसरात पाहणी करणार आहेत.
कांग्रेसची केंद्रावर टीका
दरम्यान, शस्त्रसंधी उल्लंघनाच्या मुद्यावर काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करते पण तरीही, सरकार शांत असल्याचे प्रवक्ते राशीद अल्वी यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नागरिकांनी दाखवलेले पुराव्यांचे PHOTO