आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहिमेतील मेजर म्हणाले, सर्जिकल स्ट्राइकवरून परतताना कानाजवळून गोळ्या जात होत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पीआेकेमध्ये सर्जिकल स्ट्राइकची मोहीम पूर्ण करून परतणे हे सर्वात कठीण काम होते. परतताना शत्रू सैनिकांच्या गोळ्या कानाजवळून जात होत्या. सर्जिकल स्ट्राइकचे नेतृत्व करणाऱ्या मेजरच्या हवाल्याने या साहसी मोहिमेचे सत्य समोर आले आहे.  दहशतवाद्यांच्या सीमेवरील अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय सैनिकांनी गेल्या वर्षी २८-२९ सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राइक केले होते. 
 
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइकला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने प्रकाशित एका पुस्तकात मेजरने मोहिमेबद्दलचा अनुभव मांडला. हल्ला अगदी अचूक व वेगाने करण्यात आला. परंतु लक्ष्य पूर्ण केल्यानंतर मोहिमेवरून परतणे कठीण होते. शत्रूच्या सैनिकांनी तुफान गोळीबार केला. गोळ्या कानाजवळून निघून जात होत्या. एलआेसीवर चढाईच्या मार्गे परतणे खूप कठीण होते. सैनिकांची पाठ होती. त्या बाजूने पाकिस्तानी सैन्य गोळीबार करत होते. ‘इंडियाज मोस्ट फिअरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ नावाच्या पुस्तकात अधिकारी मेजरचे नाव माइक टँगो असे सांगण्यात आले. शिव अरुर व राहुल सिंह यांनी लिहिलेल्या पुस्तकात सर्जिकल स्ट्राइकच्या १४ हकिगती मांडण्यात आल्या आहेत.

चार जणांची मदत 
सर्जिकल स्ट्राइकसाठी सैन्याने सीमेपलीकडील ४ जणांशी संपर्क साधला. त्यात पीआेकेतील २ स्थानिक ग्रामीण आणि २ याच भागातील सक्रिय पाकिस्तानी नागरिक होते. दाेन्ही गुप्तचर जैश-ए-मोहंमदशी संबंधित होते. त्यांना काही वर्षांपूर्वी भारतीय संस्थांनी परत पाठवले होते. त्यानुसार चार सूत्रांनी त्यांनी सांगितलेल्या टार्गेटबद्दल वेगवेगळ्या प्रकारची माहितीची खातरजमा केली. मोहीम छोटी होती. लक्ष्यापर्यंत जाताना उपग्रहाशी जोडलेल्या यंत्रांवरील ताज्या माहितीकडे लक्ष देण्याची सूचना सैनिकांना देण्यात आली होती. एक तासाच्या गोळीबारानंतर मोहीम फत्ते झाली होती. दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. चार टार्गेट पूर्ण झाल्यानंतर ३८ ते ४० दहशतवादी आणि २ पाकिस्तानी ठार झाले होते.
बातम्या आणखी आहेत...