आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Train Accident In Hissar 12 People Dead Reda News At Divya Marathi

हिसारमध्ये रेल्वे - टेंपोचा भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 12 जणांचा मृत्यु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - अपघातामध्ये गाडीचा चुराडा झाला आहे
हिसार - हरियाणात रेल्वे आणि एका खासगी वाहानाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात एकाच कुटुंबातील 12 जणांचा मृत्यु झाला असून मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार मुले आणि पाच महिलांचा सामावेश आहे. तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीतील सर्वजण एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जवळच्या गावाकडे निघाले होते. त्यावेळी अचानक गाडी मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर खराब झाली. त्यावेळी तेथून जाणा-या धुरी-सिरसा पॅसेंजरची या गाडीला जोरदार धडक बसली आणि अपघात झाला अशी माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.