आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैदराबादला देशाची दुसरी राजधानी करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणा राज्यनिर्मितीच्या घोषणेनंतर हैदराबादच्या राजधानीचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला असतानाच या शहराला भारताच्या दुसर्‍या राजधानीचा दर्जा देण्याची नवीच मागणी तेलंगणाबाहेरील नेत्यांनी केली आहे.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच नवी दिल्लीनंतर हैदराबादला दुसरी राजधानी करण्याची शिफारस ठेवली होती. सध्याच्या स्थितीत ते योग्य राहील, असे तेदपाचे प्रवक्ते सुधेश रामभोतला यांनी सांगितले. राज्याचे विभाजन झाल्यास हैदराबादला देशाच्या दुसर्‍या राजधानीचा दर्जा देण्याची मागणी तेलगु देसर्म पार्टीने तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा केली होती. या मुद्दय़ावर तेदपाप्रमुख एन. चंद्राबाबू नायडू अलिकडेच आंबेडकरांच्या शिफारशीचा पुनरुच्चार केला. कॉँग्रेसच्या घोषणेनंतर राजमुंद्रीचे खासदार उंडावल्ली अरुणकुमार यांनीही हैदराबाद केंद्रशासित प्रदेश होत नसेल तर दुसर्‍या राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली होती.


तेलंगणा मुद्दय़ावर माघार घेण्यास काँग्रेसचा नकार
स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीच्या निर्णयापासून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे कॉँग्रेसतर्फे बुधवारी स्पष्ट करण्यता आले. यासंदर्भात आणखी बरेच काम करावयाचे आहे. संरक्षण मंत्री ए. के. अँँटनी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीने सुचविलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करणे बाकी आहे, असे कॉँग्रेस प्रवक्ते पी.सी. चाको यांनी सांगितले.


अखंड आंध्रच्या मुद्दय़ावर भाजप द्विधास्थितीत
आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात अखंड आंध्र प्रदेश की स्वतंत्र तेलंगणाला पाठिंबा द्यावयाचा यावर भाजप कार्यकर्त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने तेलंगणाला पाठिंबा दिल्याने अनेक कार्यकर्ते त्याअनुरूप भूमिका घेताना दिसत आहेत. अखंड आंध्र प्रदेश आंदोलनात वरिष्ठ नेत्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे.