आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीड कोटीच्या या शाही बसचे आहे काचेचे छत, विमानासारख्या 4 होस्टेसही सेवेसाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - विमानाच्या धर्तीवर प्रवाशांच्या सेवेसाठी सुंदरी आणि प्रवाशांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अशा सुविधांचा अस्वाद आता जमीनीवरही घेणे शक्य झाले आहे. कारण राजस्थानी हेरिटेज आणि संस्कृतीची ओळख करून देणारी देशातील पहिली 'ग्लास कर्व्ह्ड रेस्त्रा'बस जयपूर येथून सुरू करण्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. 'मेक इन इंडिया' कॅम्पेन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'विराजो सा' ही डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत फेब्रूवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू होईल. तसेच प्रवासासोबतच पर्यटकांना लाईव्ह किचनमधून आवडीच्या डिशेसही चाखता येतील.

मेक इन इंडियाच्या संकल्पनेनुसार तयार करण्यात आलेली ही बस राजस्थानी संस्कृतीला पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. ही बस जेएलएन मार्गावरून वॉलसिटी, जनपथ, एमआयरोड, अल्बर्ट हॉल, हवामहल आणि जलमहल असे होत आमेर फोर्टपर्यंत प्रवास करेल. यामध्ये 10 ते 15 किलोमीटरच्या वेगाने विदेशी आणि स्थआनिक पर्यटक गुलाबी शहराचा प्रवास करू शकतील.

या बस विषयी माहिती देताना कार्यकारी संचालक संजय गौड यांनी सांगितले की, या बसच्या निर्मितीसाठी जवळपास 1.5 कोटी रुपये खर्च आला आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये उदयपूर आणि चंदीगडमध्ये अशा प्रकारची बससेवा सुरू करण्यात येईल. मेक इन इंडियाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या बसचे डिझाईन बँकॉक आणि थायलंडवरून येत भारतात तयार केले आहे. ही बस फेब्रूवारीच्या शेवटपर्यंत तयार होईल. या बसमध्ये लावण्यात आलेले अनब्रेकेबल ग्लास बंगळूरुमध्ये तयार करण्यात आले आहेत.

बसमध्ये असतील चार क्रू मेंबर
चार गर्ल होस्टेस, लाइव किचनमध्ये दोन शेफ, एक मॅनेजर, ड्राइवर आणि एक असिस्टंटही उपस्थित असेल.

एका दिवसाचे दर
- स्थानिक पर्यटकांसाठी 899 रुपये
- विदेशी पर्यटकांसाठी 52- 60 डॉलर

का करावा या बसमध्ये प्रवास
- एका दिवसात शहरातील महत्त्वाची सर्व ठिकाणे पाहाता येतील
- कँडल लाईट डिनर, पार्टी, लाइव किचनमध्ये मॉकटेल व्हेज आणि नॉनव्हेज, रेस्त्रां, ऑन बोर्ड टॉयलेट इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- या पारदर्शी बसमध्ये 9 एमएमचा अनब्रेकेबल ग्लास लावण्यात आला आहे.
- पहिल्या मजल्यावर 12 सीट आणि दुसऱ्या मजल्यावर 24 सीट लावण्यात आल्या आहेत.
- कार्विंग सोफा सेटचीही सुविधा
- वाय-फाय फॅसिलिटीसुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, या रॉयल बसचे फोटो...