आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

POTHOS - गुलाबी शहराचे गुलाबी सौंदर्य कुणी खुलवले ? वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरमधील अल्बर्ट हॉल हा भारताच नव्‍हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. - Divya Marathi
जयपूरमधील अल्बर्ट हॉल हा भारताच नव्‍हे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
जयपूर (राजस्‍थान) - जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणूनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. 1727 मध्ये दुस-या महाराजा जयसिंह यांनी केली. सवाई प्रतापसिंहपासून ते सवाई मानसिंह दुसरापर्यंत अनेक राजांचा या शहरातच्‍या विस्‍तारात वाटा असल्‍याचे सर्वश्रुत आहे. पण, विसाव्‍या शतकात जयपूर संस्‍थानचे दिवाण राहिलेले सर मिर्झा इस्‍माइल यांचे यामध्‍ये खूप महत्‍त्‍वाचे योगदान आहे. त्‍यांनी जयपूरचा विस्‍तारच केला नाही तर सौंदर्यीही वाढवले. त्‍यामुळेच शहरातील एका प्रमुख मार्गाला त्‍यांचे नाव दिले गेले आहे. त्‍यांनी या शहराला ‘गुलाबी’ कसे बनवले याची ही रंजक कथा...
19 जून 1942 ला सर मिर्झा इस्माइल यांना संस्‍थानचे प्रधानमंत्री केले गेले. त्‍यांनी राजकारणापासून शहराला दूर ठवेले.
कोण होते सर मिर्जा इस्माइल
स्‍वतंत्रपूर्व काळात सवाई मान सिंह (द्वितीय) हे जयपूरचे राजा होते. ते खूप चांगले सेनापतीसुद्धा होते. इंग्रजीवर त्‍यांचे प्रभुत्‍व होते. मेयो कॉलेज अजमेरमध्‍ये त्‍यांचे शिक्षण झाले. ते 1911 मध्‍ये राजा झाले. 1932 मध्‍ये त्‍यांना पूर्ण राज्यचा अधिकार मिळाला. ते आयसीएस (इंडियन सिव्‍हील सर्विस)चे अधिकारीही होते. दरम्‍यान, मैसूरचे दिवाण असलेले सर मिर्झा इस्माइल यांचा लौकिक वाढत होता. मिर्झा यांचा जन्‍म 1883 मध्‍ये तर मृत्‍यू 5 जानेवरी 1959 मध्‍ये झाला. ‘माझे सार्वजनिक जीवन’ ही त्‍यांची आत्‍मकथा लोकप्रिय आहे. मिर्झा यांच्‍या कार्याला प्रभावित होऊन सवाई मान सिंह यांनी मिर्झा यांना जयपूर संस्‍थानचा दिवाण होण्‍याचा प्रस्‍ताव पाठवला. 19 जून 1942 ला मिर्झा हे प्रधानमंत्री बनून जयपूरला आले. ते आगा जान यांचे पुत्र होते. मैसूरच्‍या सेंट बेटरिक शाळेत त्‍यांचे शिक्षण झाले. ते उच्‍च विचारांचे होते.
सी-स्कीम-स्टॅच्यू सर्कलचे बांधकाम केले
सर मिर्जा यांनी सूत्रे स्‍वीकारताच रामनिवास बागेत जंगली झाडांना कापूर रस्‍ते तयार केलेत. चौड़ा रस्‍त्‍यात दरवाजा बसवला जो की आज रामनिवास बागेसमोर आहे. पूर्वी येथे बंद परकोट होता. दरवाजामुळे आता त्रिपोलियापासून ते म्यूजियम म्‍हणजेच अल्बर्ट हॉलपर्यंतचे दृश्य स्‍पष्‍ट दिसायला लागले. शहरातील बाजारपेठेतील दुकानांवर नावे टाकण्‍याचा पायंडा घातला. या शिवाय सी-स्कीम स्टॅच्यू सर्कलचे बांधकाम करवून घेतले.
सामाजिक कार्यात होते अग्रेसर
राजपुताना विद्यापीठाचे मुर्हुमेढ रोवली. 1944 मध्‍ये जयपूरमध्‍ये पहिल्‍यांदा 32 वे अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे आयोजन केले. 1945 मध्‍ये अखिल भारतीय संस्कृत साहित्य संमेलन घेतले. दरम्‍यान, शहराला राजकारणापासून दूर ठेवले. या पद्धतीने त्‍यांनी केवळ 4 ते पाच वर्षांत पूर्ण जयपूरच बदलवून टाकले. 1946 मध्‍ये ते जयपूर सोडून चालते झाले. त्‍यांच्‍या नंतर व्‍ही. टी. कृष्णमाचारी यांनी या पदाची सूत्रे स्‍वीकारली.
पुढील स्‍लाइडवर पाहा जयपूरचे नितांत सुंदर फोटो