शिमला- पूर्ण हिमाचलप्रेदश गारठला आहे. या प्रदेशातील झरे आणि नदीचा प्रवाह बर्फवृष्टीमुळे खंडीत झाला आहे. मात्र या थंडीतही निर्सगाचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक शिमला आणि मनालीला भेट देण्यासाठी येतात. हे तुम्हाला माहित असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला हिमाचल प्रेदशमधील 'मलाणा' गावाची माहिती देणार आहोत. या गावात प्रत्येक वर्षी हिंदू धर्माचे लोक मुगल सम्राट अकबराची पूजा करतात.
का केली जाते सम्राट अकबराची पूजा-
कुल्लू जिल्ह्यातील मलाणा गावातील लोकांचे कुलदैवत जमलू असल्यामुळे या गावातील गावकरी इतर देवी-देवतांची पूज करत नाहीत, असे सांगितले जाते. या गावात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या काही परंपरा आजही पाळल्या जातात. एकदा मुगल सम्राट अकबराने हे गाव ताब्यात घेण्याचे फर्मान सोडले. मात्र देवता जमलूने दिल्लीमध्ये बर्फवृष्टी केल्यामुळे मुगल सम्राटाने गावात येऊन जमलू देवाची माफी मागितली. तेव्हापासून या गावातील लोक मुगल सम्राट अकबराची पूजा करतात असे सांगतिले जाते.
फागली उत्सव-
फागली उत्सवाच्या निमित्ताने अकबराची सोन्याची मुर्ति आणि चांदीच्या 'हरिण'ची पूजा केली जाते. जाणकारांच्या मते अकबरासाठी दोन उत्सव समर्ति करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक 'फागली उत्सव'. या उत्सवाच्या निमित्ताने पाच दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी 'सम्राट अकबरा' बरोबर जम्दग्नि ऋषिची पूजा करण्यात येते.
पुढील स्लाईडवर पाहा मलाणा गावची छायाचित्रे...