आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे विमान याच मार्गावरून जाणार होते; बघा यूक्रेन बंडखोरांच्या संवादाचा थरारक VIDEO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कीव - अ‍ॅम्स्टरडॅमहून क्लालालंपूरला जाणा-या मलेशियन एअरलाइन्सच्या MH17 या प्रवासी विमानावर गुरुवारी यूक्रेनमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानही याच मार्गावरून जाणार होते.
मोदी ब्रिक्‍स देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलला गेले आहेत. एअर इंडियाचे त्यांचे विमान फ्रँकफर्टहून सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी निघाले. डोनेस्क (जेथे मलेशियाच्या विमानावर हल्ला झाला) येथे पोहोचण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतो. म्हणजे त्याच्या एका तासानंतर मोदींचे विमान, युक्रेन फ्लाइट इन्फॉर्मेशन रीजन (FIR) मधून गेले असते.
नाव जाहीर न करण्याच्या अटिवर एका अधिका-याने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला काहीही धोका नव्हता. पण याच परिसरातून ते जाणार होते. पण मोदींचे विमान त्याच मार्गाने गेले की, दुस-या मार्गाने हे मात्र अधिका-याने सांगितले नाही.
युरोपच्या सर्व फ्लाइट्स दोन एअर कॉरिडोरचा वापर करतात. त्यात युक्रेन फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजन आणि सिम्फरपोल फ्लाइट इन्फॉर्मेशन रीजन यांचा समावेश आहे. 3 एप्रिलला युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजेंसीने एका सेफ्टी बुलेटिनमध्ये सिम्फरपोल एअरस्पेसमध्ये विमानप्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच सर्व फ्लाइट्स इन्फॉर्मेशन रीजन (FIR) चा वापर करतात. तेथूनच मोदींचे विमान जाणार होते.
अंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी रद्द केली यूक्रेनमधून होणारी उड्डाणे

या घटनेनंतर जगभरातील विमान कंपन्या सतर्क झाल्या आहेत. युरोपियन कॉकपिट असोसिशनने अनेक युरोपियन एअरलाइन्सना युक्रेनमधील एअरस्पेस न वापरण्याचा सल्ला दिला आहे. घटनेनंतर एजंसीने स्टेटमेंटद्वारे युरोपियन प्रशासनाला या क्षेत्रातून जाणा-या फ्लाइट्सची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे.

फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशननेही अमेरिकन पायलट्सना नोटीस देऊन या मार्गाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे विमानावर हल्ल्याच्या बातम्यांनतर काही वेळातच एअर फ्रान्सने युक्रेन आणि रशियाच्या एअरस्पेसचा वापर न करण्याची घोषणा केली होती.
याच मार्गावरून दुबईहून कीवला जाणार्या अमिरात एअरलाइन्सची EK171 ही फ्लाइट मध्यरात्री दुबईकडे परत फिरवण्यात आली. MH17 वरील हल्ल्याबाबत समजल्यानंतर अमिरात एअरलाइन्सने हा निर्णय घेतला.

इंडियन एअरलाइन्स, टर्किश एअरलाइन्स, रशियाची एअरोफ्लोट आणि ट्रांसाएरो एअरलाइन्स, लुफ्तांसा एअरलाइन्स, व्हर्जिन एअर, एअर फ्रांस आणि ब्रिटिश एअरवेजनेही यूक्रेनला उड्डाणे न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या परिसरात ही घटना घडली त्याठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. तेथून विमान न नेण्याबाबत सूचनाही देण्यात आली आहे. पण अंतर आणि कमी खर्चामुळे अनेक विमान कंपन्या या मार्गाचा वापर करतात.
विमान पाडल्यावर रशियासमर्थित बंडखोरींनी एकमेकांशी संवाद साधला....याचा थरारक व्हिडिओ पुढील स्लाईडवर...