आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maldives Foreign Land Ownership Reform Bill Is Approved

मालदीवमध्ये आता परदेशी नागरिकही जमिनीचा मालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माले- आता मालदीवमध्ये परदेशी नागरिकही जमीन खरेदी करू शकतील. संसदेने यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विरोधी पक्षाने मात्र चीनला जमीन विकण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप केला आहे.

धक्कादायक म्हणजे एवढ्या महत्वाच्या प्रस्तावावर बुधवारी चर्चेचा नुसता फार्स करून मंजुरी देण्यात आली. कायद्याच्या बाजूने ७० आणि िवरोधात १४ सदस्यांनी मतदान केले. नवीन कायद्याला आता राष्ट्राध्यक्षांची मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. कायद्यानुसार कोणीही परदेशी नागरिक देशातील जमिनीचा मालक होऊ शकतो. ६४ अब्ज रुपयांहून अधिक गुंतवणूक करणाऱ्यास मालकी हक्काची परवानगी मिळू शकेल. त्यामुळे आता बेटांचा समूह असलेल्या देशात जमीन खरेदीची जणू स्पर्धा सुरू होऊ शकते. त्यासाठी डझनभर परदेशी कंपन्या पूर्वीपासूनच त्यासाठी प्रतीक्षेत होत्या. हॉटेल, रिसोर्ट तयार करण्यासाठी या कंपन्यांनी अगोदरच ९९ वर्षांचे करार केलेले आहेत. दक्षिण चिनी सागरात चीनने आपला दबदबा वाढवण्याचे सर्व प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

१,१९२ छोट्या बेटांचा समूह
मालदीव १ हजार १९२ छोट्या-छोट्या बेटांनी बनलेला आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये पहिल्यांदा देशात सत्तापालट झाला होता. लोकशाही मार्गाने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष मोहंमद नशीद यांना सत्ता सोडावी लागली होती.
चीन बनवणार तळ
नवीन कायद्यामुळे चीनला मालदीवमध्ये आपले तळ तयार करण्याची आयतीच संधी मिळणार आहे. मालदीव पूर्व आणि पश्चिम दरम्यान अतिशय महत्वाचा सागरी मार्ग आहे. मालदीवने राजधानी माले आणि विमानतळ असलेल्या बेट यांना जोडणाऱ्या १.४ किलो मीटर लांब पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने अगाेदरच चीनची मदत मागितली आहे.