आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात जड तोफ: ओढायला लागत होते 10 हात्ती, 400 बैल अन् शेकडो माणसांची ताकत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅव्हल डेस्क- तुम्ही कधी अशा तोफेबद्दल ऐकले आहे का जिला ओढण्यासाठी 10 हत्ती, 400 बैल आणि शेकडो माणसांची ताकत लागत होती. ऐकुण आश्चर्य वाटेल, पण अशी एक तोफ भारतात आहे. ही तोफ जगातील सर्वात जास्त वजनाची तोफ आहे.


कुठे आहे ही तोफ...
- कर्णाटकचे ऐतिहासीक शहर विजापूर येथे असलेल्या या तोफेचे नाव मालिक-ए-मैदान असे आहे.
- मध्ययुगीन काळात या तोफेचा वापर करण्यात आला होता. त्यावेळची ही सर्वात मोठी तोफ होती.
- या तोफेचे वजन 55 टन, लांबी 14.6 फुट आणि डायमिटर 4.9 फुटांचा आहे. 
- तालीकोट युद्ध जिंकल्यानंतर 16 व्या शतकात विजापूरचा शासक इब्राहिम आदिल शाह याने या तोफेला स्थापित केले होते.


बुर्ज-ए-शरीफवर ठेवण्यात आली आहे तोफ
- विजापूर येथिल बुर्ज-ए-शरीफ नावाच्या बूरुजावर ही तोफ आहे.
- बुर्ज-ए-शरीफचा अर्थ सिंहांचे बुरुज असा होतो. हा बुरुज आदिलशाहीच्या शासनात बनवण्यात आला होता.
- सिंह आपला जबडा उघडतोय असे आकृती या तोफेवर कोरण्यात आली आहे.
- या तोफेवर एका हत्तीला दोन सिंह नखांनी फाडत असल्याची आकृती देखिल कोरण्यात आली आहे.


काय लिहिले आहे तोफेवर...
या तोफेवर लिहिलेल्या अभिलेखांवरुन कळते की, एका तुर्की हसन रूमीचा मुलगा मोहम्मदने या तोफेची निर्मिती करुन घेतली होती. त्यातीलच एका अभिलेखानुसार औरंगजेबने लिहिले आहे की, मी मालिक-ए-मैदानवर कब्जा केला आहे.


जगातली सर्वात जड तोफ
- इ.स. 1886 कॅप्टन टेलर उर्फ जेम्स फर्ग्यूसन याचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकात मालिक-ए-मैदान जगातील सर्वात जड तोफ असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
- हसन रुमीने ह्या तोफेला अहमदनगर येथून घडवून घेतले होते. त्यावेळी पहिला बुपहाल निजामशाहाचे तेथे राज्य होते. हा सुलतान आपल्या जवळ मोठ-मोठे हत्यार बळगत असे.


आवाज ऐकताच पळून गेले होते सैन्य
- विजय नगरजवळील रक्कस-तंगडि येथे झालेल्या युद्धात या तोफेचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. या युद्धात विजय नगरच्या राज्याचा मृत्यु झाला होता.
- या तोफचा आवाज एवढा होता, की विजय नगरच्या राज्याचे सैन्य आवाज ऐकुणच पळून गेले होते.
- युद्ध संपल्यानंतर या तोफेला तेथून 80 किमी. दुर असलेल्या पुरंदरच्या किल्यात ठेवण्यात आले होते. पुरंदरच्या किल्यातुन इ.स. 1632 मध्ये एका मराठा सरदाराने या तोफेला कर्णाटकातील विजापुर येथे स्थापित केले होते.


40 किलो दारुगोळा लागत असे..
या तोफेला वापरण्यासाठी 40 किलो दारु आणि लोखंडाचे अनेक गोळे लागत होते. एवढे सगळे एका वेळेस मारा करण्यासाठी लागत होते. दारु चे भंडार संपल्यानंतर दगडाचे तुकडे किंवा तांब्याचे सिक्के भरुन या तोफेचा वापर करण्यात येत होता.


या ठिकाणी कसे पोहोचायचे
By Air:
विजापुरसाठी बेळगाव विमानतळ सर्वात जवळ आहे. मुंबई किंवा बॅंगलोर येथुन विमाणाने बेळगावसाठी विमान मिळू शकते. बेळगाववरुन 205 किमी अंतरावर विजापुर आहे.
 

By Rail: विजापुरचा रेल्वे रुट बँगलोर, मुंबई, होस्पेट आणि वास्कोदिगामाशी जोडलेला आहे.
 

By Road: कर्नाटक राज्य परिवहन मंडाळाच्या बसेस विजापुरसाठी नियमित सुरु असतात. बदामी, बँगलोर, हुबळी आणि विजापुर या ठिकाणी या बसेस नियमित सुरु असतात.


पुढिल स्लाइडवर पहा मालिक-ए-मैदान तोफेचे फोटोज...


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...