आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malin Village Pune And Other Ghost Towns Of India

पुण्‍याजवळील माळीण गावासारखी अवस्‍था, आजही स्‍मशानासारखी भासतात ही गावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूस्खलनामुळे पुणे जिल्‍ह्यातील माळीण हे गाव उद्ध्वस्त झाले. संपूर्ण गाव गाडल्‍या गेल्‍यामुळे मृत्‍यांचा आकडा 108 पर्यंत पोहोचला आहे. अजूनही माळीण गावात मदत कार्य सुरू आहे. पण अशा स्वरुपाची घटना केवळ महाराष्ट्रात घडली असे नाही तर देश-विदेशातही अशा घटना घडल्याची उदाहरणे दिसून येतात.
भूस्‍खलनानंतर या गावाची अवस्‍था स्‍मशानभुमीसारखी झालेली. पावसामुळे अडथळा निर्माण होत आहे. उभे गाव डोंगराखाली गाडले गेल्याने माळीण गावावर शोककळा पसरली. पण याचे दु:ख करायलाही गावात कोणी उरले नाही. गावातल्या 70 घरांपैकी पाच- सहाच घरे या महासंकटापुढे कशीबशी बचावली आहेत.
माळणी हे काही आपल्‍या देशातील पहिले उदाहरण नाही. या आगोदर भूस्‍खलनामुळे अनेक गावे उद्धवस्‍त झालेली आहेत. मात्र यापासून कोणतेच सरकार धडा घेत नसल्‍यामुळे माळणी सारखी घटना घडत आहेत. भूस्‍खलनामुळे याआगोदर उद्धवस्‍त झालेल्‍या गावांची माहिती तुम्‍हाला देत आहोत. काही क्षणांत भूस्खलन झाले आणि अख्‍ये गाव गडप झाल्‍याची काही उदाहरणे जगाच्‍या इतिहासात आहेत. या गावांचीही अवस्‍था अगदी स्‍मशानासारखी झालेली आहे. आज ही गावे निर्मनुष्‍य म्‍हणून ओळखली जातात.
उद्धवस्‍त झालेली गावे-
गाव- धनुषकोडी, भारत- श्रीलंकेच्‍या सिमेवर असलेले गाव.
उद्धवस्‍त होण्‍याचे कारण- 1964 मध्‍ये आलेले चक्रीवादळ. हे भुताचे शहर म्‍हणून ओळखले जाते. अंधार पडल्‍यानंतर या गावकडे कुणी फिरकत नाही. या परिसरामध्‍ये आलेल्‍या पर्यटकांना सुचना दिली जाते, की या गावत जायचे असेल तर दिवसा जा. तेही समुहामध्‍ये. एकट्याने या गावात आजही कुणी जात नाही.
भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या गावाची माहिती वाचा पुढील स्‍लाईडवर...