आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८० टक्के कुपोषित मुले बान्सवाडात सुधारली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बान्सवाडा - मुलांच्या कुपोषणाविरोधात राजस्थानात पहिला पथदर्शी प्रकल्प बांसवाडामध्ये सुरू झाला. सलग सहा महिने काम केल्यानंतर आता त्यात यश आले असून ८० टक्के मुलांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येत आहे. या प्रकल्पाला मिळालेले यश लक्षात घेता हा प्रकल्प आता संपूर्ण राजस्थानात लागू केला जाण्याची शक्यता आहे.

या पथदर्शी प्रकल्पात कुशलगड, बागीदौरा, सज्जनगड व छोटी सरवन विभागातील मुलांची निवड करण्यात आली होती. आरोग्य विभागाकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत होते. तसेच आठवड्यातून एकदा त्यांची आरोग्य तपासणी व दररोज “अमृत’ देण्यात आले. त्यात त्यांना भरपूर पोषकद्रव्ये असलेला आहार देण्यात आला. मुलांच्या आहाराबाबत घरच्यांनाही माहिती देण्यात आली व त्यांच्याकडून नियमित फीडबॅक घेण्यात आला. यामुळे अतिशय कमी वेळेत कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या व्यवस्थापक डॉ. वनिता त्रिवेदी यांनी बांसवाडा येथील पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्यभर लागू
करण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे म्हटले आहे.

१३६१ मुलांची प्रकृती सुधारली
याेजनेत प्रारंभी १३९२ मुलांची निवड करण्यात आली होती. त्यात अतिकुपोषित मुलांची संख्या जास्त होती. त्यांच्या तब्येतीची वाढ खुंटल्याने डॉक्टरांनीही हात टेकले होते. सप्टेंबर २०१५ मध्ये या मुलांची निवड करण्यात आल्यानंतर ६ महिन्यांत आशा कार्यकर्ती व जवळच्या प्राथमिक उपचार केंद्राच्या देखरेखीखाली पथदर्शी प्रकल्पावर काम सुरू करण्यात आले. सहा महिन्यांनी मुलांची पुन्हा तपासणी केली असता १३९२ पैकी १३६१ मुलांच्या प्रकृतीत ८० टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली आहे.

अशी केली मुलांची निवड
या प्रकल्पात मुलांच्या आरोग्याचे मोजमाप करून त्यांची निवड करण्यात आली. कुपोषित बालकांचे वजन, उंची, वय व इतर तपशील विचारात घेण्यात आला. ज्यांचे माप ११. ५ सेंटिमीटरपेक्षा कमी आहे, त्यांची निवड करण्यात आली. तसेच मुलांचे वजन, उंची पाहून झेड स्कोअर म्हणजे शारीरिक रचना तपासण्यात आली. यानंतर चार पंचायत समिती स्तरावर मुलांची अंतिम निवड करण्यात येऊन त्यांच्या सर्वांगिण विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आलेे.
बातम्या आणखी आहेत...