आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांनी तृणमूलला घेरले, ममता यांचे आव्हान : जे करायचे ते करा, मी हजारदा बोलेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक रंजक होत आहे. कोलकातामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी गुरुवारी सांगितले की, आयोगाने मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना नोटीस पाठवली आहे. प्रकरण आचारसंहितेच्या उल्लंघनाचे आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यांनी वीरभूममध्ये आयोजित सभेत आयोगाला कारवाई करण्याचे आव्हान दिले.
झैदी म्हणाले, ममता यांनी आसनसोलला नवीन जिल्हा करण्याचे आश्वासन दिल्याचे आम्हाला समजले आहे. हे आचारसंहिता उल्लंघनाचे प्रकरण आहे. ममता यांच्या उत्तरानंतर कारवाई निश्चित होईल. याबाबत ममता म्हणाल्या की, मला नोटिशीची माहिती मिळाली आहे. मी जे काही बोलले ते पुन्हा बोलेल. एकदा नव्हे, तर हजार वेळस म्हणेन. जे करायचे ते करा.

रात्रंदिवस माझ्याविरुद्ध तक्रारींचा ओघ सुरू : ममता
सकाळपासून रात्रीपर्यंत भाजप,माकपा,काँग्रेस माझ्याविरुद्ध तक्रारी देते. प्रत्येक गोष्टीचे मी उत्तर मागणार आहे. हा माझा हक्क आहे. मला त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. मला केवळ लोकांकडून प्रमाणपत्र हवे आहे. लोक मतदानातून उत्तर देतील.’ - ममता बनर्जी, मुख्यमंत्री आणि तृणमूल प्रमुख
पुढे वाचा... स्टिंग ऑपरेशन: तृणमूल खासदारांचे उत्तर सादर